Friday, July 31, 2026
Home Gadchiroli पाच डॉक्टरांनी एकाचवेळी राजीनामे ; अहेरी महिला व बाल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार....

पाच डॉक्टरांनी एकाचवेळी राजीनामे ; अहेरी महिला व बाल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार. 📍राजीनाम्यांमागील कारण अद्याप अस्पष्ट ; रुग्णांवर याचा परिणाम होण्याची शक्यता.

0
21

पाच डॉक्टरांनी एकाचवेळी राजीनामे ; अहेरी महिला व बाल रुग्णालयातील धक्कादायक प्रकार.

📍राजीनाम्यांमागील कारण अद्याप अस्पष्ट ; रुग्णांवर याचा परिणाम होण्याची शक्यता.

सुकदर्शन वृतांत 
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील नव्याने सुरू करण्यात आलेल्या महिला व बाल रुग्णालयाला मोठा धक्का बसला आहे. रुग्णालयातील पाच डॉक्टरांनी अचानक एकाच वेळी राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे. राजीनाम्यांमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोलीतील जिल्ह्यातील अहेरी येथे महिला व बालकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी या उद्देशाने अत्याधुनिक सुविधा असलेले महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यात आले. मात्र रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होण्यापूर्वीच पाच डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिल्याने आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रशासकीय ताण, अपुऱ्या सुविधा,मनुष्यबळाचा अभाव किंवा अन्य अंतर्गत कारणांमुळे डॉक्टरांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. अहेरीसह भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा या दुर्गम भागातील हजारो महिला व बालकांसाठी हे रुग्णालय महत्त्वाचे ठरणार होते. मात्र डॉक्टरांच्या राजीनाम्यांमुळे नागरिकांना पुन्हा उपचारासाठी जिल्हा मुख्यालय किंवा खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राजीनाम्यांमागील कारणांची सखोल चौकशी करून रिक्त पदांवर तातडीने नियुक्त्या कराव्यात, अशी मागणी आता नागरिकांकडून जोर धरत आहे.एखादा प्रसंग ओढवल्यास तातडीने रुग्णांनी नेमकं जायचं कुठे ? हा मोठा प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!