Friday, July 31, 2026
Home Breaking News सावली तालुक्यातील आसोला (मेंढा) तलावात मासेमारीस गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू.

सावली तालुक्यातील आसोला (मेंढा) तलावात मासेमारीस गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू.

0
27

सावली तालुक्यातील आसोला (मेंढा) तलावात मासेमारीस गेलेल्या व्यक्तीचा बुडून मृत्यू.

सुकदर्शन वृतांत
सावली : सावली तालुक्यातील आसोला (मेंढा ) चक येथील गुरूदास जयराम मेश्राम वय,३७ वर्ष यांचा आसोला तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार,गुरूदास मेश्राम हे दि. २४ जून रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे एकटेच आसोला तलावात मासेमारीसाठी गेले होते.मासेमारी करत असताना त्यांचा डोंगा अचानक पलटल्याने ते तलावाच्या खोल पाण्यात बुडाले.
तलाव सुमारे २०० मीटर खोल असल्याने शोधकार्याला अडचणी आल्या.घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली.अंधार पडल्याने व पाण्याची खोली जास्त असल्याने रात्री मृतदेहाचा शोध लागला नाही.
दि.२५ जून रोजी सकाळी ७ वाजता पोलीस व गावकऱ्यांच्या मदतीने पुन्हा शोधमोहीम राबविण्यात आली.त्यावेळी मृतदेहाचा शोध घेऊन तो पाण्याबाहेर काढण्यात आला.पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल येथील रुग्णालयात पाठविण्यात आला.
या कारवाईत ठाणेदार नितेश डोर्लीकर,सहायक पोलीस उपनिरीक्षक चाटे,चंद्रशेखर सिडाम,येनुनाथ मडावी, बळीराम बारेकर,सुरेश शेंडे,योगेश खोब्रागडे, दत्ताराव शिंदे तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला.
मृत गुरूदास मेश्राम यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!