Friday, July 31, 2026
Home Breaking News जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट ; नागरिकांनी अफवांवर...

जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.- मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे 📍भरती संदर्भातील माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळ व वृत्तपत्रांद्वारेच.

0
23

जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये.- मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे

📍भरती संदर्भातील माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळ व वृत्तपत्रांद्वारेच.

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर (Peon) पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी, बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केला आहे.
नागरिकांनी अशा अप्रमाणित जाहिरातींवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही प्रकारची आर्थिक व्यवहार अथवा वैयक्तिक माहिती संबंधित व्यक्तींना देऊ नये,असे आवाहन केले आहे.मागील काही दिवसांपासून विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसारित केली जात आहे.
या जाहिरातीत गडचिरोली, अहेरी, आरमोरी,भामरागड,चामोर्शी, एटापल्ली,कोरची, कुरखेडा,मुलचेरा, सिरोंचा, देसाईगंज,धानोरा यांसह विविध तालुक्यांतील शाळांमध्ये प्रतिमहा २२ हजार रुपये वेतनावर भरती केली जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, सदर जाहिरात जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी प्रसिद्ध केलेली नसून तिचा जिल्हा परिषदेशी कोणताही संबंध नाही. संबंधित जाहिरात तयार करून सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आली असून ती नागरिकांची दिशाभूल करणारी आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, गडचिरोली यांनी सांगितले की, जिल्हा परिषदेमार्फत कोणतीही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असल्यास त्यासंदर्भातील अधिकृत जाहिरात केवळ जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि मान्यताप्राप्त दैनिक वृत्तपत्रांमधूनच प्रसिद्ध केली जाते.त्यामुळे नागरिकांनी केवळ अधिकृत माध्यमांवरील माहितीवरच विश्वास ठेवावा.
जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व नागरिक, बेरोजगार युवक – युवती तसेच पालकांना आवाहन केले आहे की,सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित भरती जाहिरातींची सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये.कोणत्याही संशयास्पद जाहिरातीबाबत संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून खात्री करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!