Monday, September 14, 2026
Home Chandrapur विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या ब्रह्मपुरी तालुकाध्यक्षपदी सुधीर शिवुरकर जिल्हाध्यक्ष विजय...

विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या ब्रह्मपुरी तालुकाध्यक्षपदी सुधीर शिवुरकर जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान

विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या ब्रह्मपुरी तालुकाध्यक्षपदी सुधीर शिवुरकर जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे सहसंपादक) दि,२३/०८/२६ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागाच्या ब्रम्हपुरी तालुकाध्यक्षपदी सुधीर शिवुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष विजय कोरेवार यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आहे.
 विमुक्त जाती व भटक्या जमाती समाजाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणे, समाजातील नागरिकांशी संपर्क वाढविणे तसेच काँग्रेस पक्षाची विचारधारा व ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी शिवुरकर यांच्यावर सोपविण्यात आली.
 प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ विधिमंडळ गटनेते आमदार विजय वडेट्टीवार आणि विभागाच्या प्रदेशाध्यक्ष पल्लवी रेणके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करण्याची अपेक्षा करण्यात आली.
error: Content is protected !!