Home Gadchiroli गडचिरोली तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान समिती गठीत
गडचिरोली तालुकास्तरीय संजय गांधी निराधार अनुदान समिती गठीत
सुरेश कन्नमवार – मुख्य संपादक
गडचिरोली : दि.१९ ऑगस्ट २०२६ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार गडचिरोली तालुक्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुकास्तरीय अशासकीय सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथील तहसीलदार (संजय गांधी योजना) कार्यालयाने याबाबत आदेश जारी केला आहे. या समितीवर सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी श्री.यश कोंडावार यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
श्री.दिपक भारसाकडे वि.जा.भ.ज.सदस्य
सौ.शितल घनश्याम बन्सोड महिला अशासकीय प्रतिनिधी,सदस्य
श्री.वसंत गावतुरे इतर मागासवर्गीय,सदस्य
सौ.उषा कैलास बन्सोड मागासवर्गीय (अ.जा/अ.ज),सदस्य
श्री.दत्तु माकोडे,अपंग प्रवर्गातील,सदस्य
श्री.आकाश सातपुते शासन नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेचा,सदस्य
श्री.प्रमोद सुधाकर उमरगुंडावार,सामाजिक क्षेत्र,सदस्य
श्री.शंकर नेताम,ज्येष्ठ नागरीक,सदस्य
यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
समाजातील निराधार,वंचित,दिव्यांग तसेच पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या विविध सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.तालुक्यातील संबंधित योजनांच्या अंमलबजावणीसाठी समितीच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांच्या प्रकरणांवर कार्यवाही केली जाणार आहे.
या नियुक्ती आदेशावर जिल्हाधिकारी, गडचिरोली यांची स्वाक्षरी असून, संबंधित लोकप्रतिनिधींनाही आदेशाची प्रत माहितीसाठी देण्यात आली आहे.
error: Content is protected !!