Home Education पालवीच्या स्तर – २ च्या प्रशिक्षणातून बालशिक्षणाला मिळाली नवी दिशा
पालवीच्या स्तर – २ च्या प्रशिक्षणातून बालशिक्षणाला मिळाली नवी दिशा
सुकदर्शन वृतांत
अमरावती : दिनांक,22/08/2026 शनिवार येवदा (दर्यापूर) बालकांना खेळता – खेळता, कृतीतून आणि अनुभवातून आनंदाने शिकता यावे, तसेच सर्व अंगणवाडी सेविकांना बालकेंद्रित व गुणवत्तापूर्ण बालशिक्षणासाठी सक्षम करता यावे.
या उद्देशाने QUEST संस्थेअंतर्गत, जिल्हा परिषद अमरावती व ICDS यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या ‘पालवी’ उपक्रमाचे दोन दिवसीय निवासी स्तर-२ चे प्रशिक्षण येवदा येथे उत्साहाने पार पडले.
दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील २८ मॉडेल अंगणवाडी सेविका व दोन्ही तालुक्यातील पर्यवेक्षिकानी प्रशिक्षणात सहभाग घेतला.यावेळी Play-Based Learning, मुक्तखेळ, गोष्टी, गाणी, कृतीआधारित शिक्षण, भाषा व गणिताचे अनुभव आणि शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर यावर कृती व प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात आले.
खेळ,अनुभव आणि कृतीतून शिकणारे बालक घडविण्यासाठी सेविकांची भूमिका अधिक प्रभावी कशी करता येईल,यावर प्रशिक्षणात विशेष भर देण्यात आला. अंगणवाडीतील दैनंदिन शिक्षण अधिक आनंददायी, कृतीशील आणि बालकेंद्रित करण्यासाठी विविध उपक्रमांचा प्रत्यक्ष अनुभव सेविकांना देण्यात आला.
प्रशिक्षणासाठी रिसोर्स पर्सन म्हणून QUEST च्या भावना पाटील व भूषण पटारे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी CDPO मा.स्वप्नील गायकवाड,विस्तार अधिकारी मा. प्रशांत आढाव, मा.फैजान शेख व पर्यवेक्षिका मा.चंद्रकला खेडकर,मा.सुनीता राऊत, मा.शरयू धुमाळे
मा.नेहा वानखेडे,काजल देशमुख तसेच पालवी प्रकल्प अधिकारी मा.मुन रायपुरे, प्रकल्प समन्वयक पंकेश येरमलवार,राम ठाकरे,रामेश्वर तोटे व साक्षी गागरे उपस्थित होते.
सक्षम सेविका घडवून त्यांच्या माध्यमातून बालशिक्षण अधिक समृद्ध आणि आनंददायी करण्याच्या दिशेने ” पालवी ” उपक्रमाची वाटचाल सुरू आहे.
error: Content is protected !!