Sunday, September 13, 2026
Home Chandrapur सुब्बई ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय ; सरपंचासह सर्व सदस्यांविरोधात अविश्वास ठराव मंजूर. सुब्बई...

सुब्बई ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय ; सरपंचासह सर्व सदस्यांविरोधात अविश्वास ठराव मंजूर. सुब्बई ग्रामसभेत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा ; सरपंचासह सर्व सदस्यांवर अविश्वास ठराव,ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी.

सुब्बई ग्रामसभेत ऐतिहासिक निर्णय ; सरपंचासह सर्व सदस्यांविरोधात अविश्वास ठराव मंजूर.

📍सुब्बई ग्रामसभेत ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा ; सरपंचासह सर्व सदस्यांवर अविश्वास ठराव,ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या निलंबनाची मागणी.

सुकदर्शन वृतांत
राजुरा : राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या सुब्बई येथे २० ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत सरपंच सुरेखा सुधाकर आत्राम यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अविश्वास ठराव मंजूर केला. ठराव क्रमांक १६ सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला.
ग्रामसभेला ४०० हून अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. मात्र, ग्रामपंचायत अधिकारी मा.निखिल डांगे हे ऐनवेळी ग्रामसभेला अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली.ग्रामसभा सुरळीतपणे न घेता सभा रद्द करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला.
ग्रामस्थांनी सरपंच व सर्व सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी सरपंच सुरेखा सुधाकर आत्राम यांनी राजीनामा देण्याऐवजी गावकऱ्यांची माफी मागितल्याचे सांगण्यात आले.उपस्थित ग्रामस्थांनी राजीनाम्याची मागणी कायम ठेवली.
सरपंच म्हणून चार वर्षांचा कालावधी उलटूनही महिला ग्रामसभा घेण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. तसेच ग्रामसभेसाठी आलेल्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी ग्रामसभेला अनुपस्थित राहून ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी ग्रामसभेत करण्यात आली. आगामी १५ दिवसांत सरपंचासह सर्व सदस्यांवर आवश्यक कारवाई न झाल्यास महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने आंदोलन करणार असल्याचा इशारा उपस्थित ग्रामस्थांनी दिला.
या संपूर्ण प्रकरणामुळे सुब्बई ग्रामसभेतील निर्णयाची तालुक्यात चर्चा सुरू झाली असून, प्रशासन आता ग्रामस्थांच्या मागण्यांवर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
error: Content is protected !!