Thursday, July 30, 2026
Home Education निट पेपरफुटी प्रकरणात केंद्रिय शिक्षणमंत्री प्रधान यांनी राजीनामा घ्यावा.कुरखेडा रिपाई तर्फे निदर्शने...

निट पेपरफुटी प्रकरणात केंद्रिय शिक्षणमंत्री प्रधान यांनी राजीनामा घ्यावा.कुरखेडा रिपाई तर्फे निदर्शने व निवेदनाद्वारे मागणी.

0
12

निट पेपरफुटी प्रकरणात केंद्रिय शिक्षणमंत्री प्रधान यांनी राजीनामा घ्यावा.कुरखेडा रिपाई तर्फे निदर्शने व निवेदनाद्वारे मागणी.

सुकदर्शन वृतांत 
कुरखेडा : निट पेपरफुटी प्रकरणात केंद्रिय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हेच जबाबदार असुन पेपरफुटी प्रकरणात असंख्य विध्यार्थांचे नुकसान झाले तर 22 विध्यार्थांनी आत्महत्या केली याला जबाबदार शिक्षणमंत्री असुन त्यांनी राजीनामा घ्यावा या मागणीसाठी संशोधक सोनम वांगचुक व कांक्रोज जनता पार्टीचे प्रर्वतक अभिजित दिपके यांनी जंतर-मंतर दिल्ली येथे २२ दिवश उपोषण केले.
त्यांच्या समर्थनाथ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा गडचिरोली चे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या नेतृत्वात तालुका कुरखेडा आरपिआयच्या कार्यकर्त्यांनी तहसिल कार्यालय कुरखेडा समोर निदर्शने करून तहसिलदार जाधव साहेब यांच्या मार्फतीने महामहीम राष्ट्रपती व पंतप्रधान नवी दिल्ली यांना निवेदन देण्यात आले.
कुरखेडा तहसिलदार यांना निवेदन देतांना रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष दशरथ साखरे मारोती भैसारे डोमाजी नंदेश्वर’ विदर्भ राज्य आंदोलन समिती चे घिसु पाटिल खुणे समता सैनिक दलाचे मुक्ताजी दुर्गे अभिमन्यु बनसोड रिपाईचे तालुका अध्यक्ष सुनिल सहारे
सचिव मोहन मेश्राम ताराचंद नंदेश्वर मारेश्वर राऊत दादाजी रामटेके दिलबर जोगी आर्शिवाद गजभिये मंगेश भानारकर बंडू सहारे जांभुळकर तर महिला आघाडीच्या लता सहारे विलासिनी राऊत बबिता रामटेके सरदारे मॅडम आदिसहीत बहुसंख्य रिपाईचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!