Home Breaking News गोकुलनगर गडचिरोली येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणा-या पाच आरोपी पोलीसांनी...
गोकुलनगर गडचिरोली येथे प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची अवैधरित्या साठवणूक करणा-या पाच आरोपी पोलीसांनी केली अटक.
📍 ०२ लाख १५ हजार ७१० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : महाराष्ट्र शासनाने सुगंधित तंबाखूच्या विक्री व वाहतुकीवर कायदेशिर प्रतिबंध केला आहे.त्याअनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री.एम.रमेश यांचेकडून गडचिरोली जिल्ह्यातील प्रतिबंधित सुगंधित तंबाखू,अवैध दारु,जुगार व ईतर अवैध व्यवसायांवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें यांना देण्यात आले आहेत.
यावरुन दिनांक,२० जून २०२६ रोजी गडचिरोली पोलीसांकडून सुगंधित तंबाखूची अवैधपणे साठवणूक करणाऱ्या आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.सविस्तर वृत्त असे आहे की,दिनांक २०/०६/२०२६ रोजी सहाय्यक पोलीस अधिक्षक,गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे यांना गोपनिय बातमिदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, इसम नामे विवेक अवधराम गुप्ता रा.गोकुलनगर ता.व जि.गडचिरोली याने त्याच्या राहत्या घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू अवैधरित्या विक्रीकरीता साठवून ठेवला आहे.
सदर खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने सहाय्यक पोलीस अधिक्षक, गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने आरोपी याच्या किरायाच्या घरी व राहत्या घरी अशा दोन ठिकाणी पंचासमक्ष धाड टाकली असता, दोन्ही घरात मोठ्या प्रमाणावर अवैध तंबाखुची साठवणूक केलेली असल्याचे आढळून आले.
सदर कारवाई दरम्यान खालीलप्रमाणे वर्णन असलेला एकूण मुद्देमाल मिळून आला.
१) ईगल हुक्का शिशा तंबाखु असे लिहिलेले एकूण ८२ पॅकेट एकूण किंमत अंदाजे ४०,१२०/- रुपये
२) आठ पांढर्या रंगाच्या चुंगळीत कच्ची सुपारी एकूण ३२३ कि.ग्रॅ. एकूण किंमत अंदाजे १,६१,५००/- रुपये
३) ईगल शिशा खर्रा पन्नी एकूण ६७ कि.ग्रॅ. एकूण किंमत अंदाजे १२,०००/- रुपये, व
४) इतर साहित्य एकूण किंमत अंदाजे २,०९०/- रुपये असा एकूण २,१५,७१०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल गडचिरोली पोलीसांनी जप्त केला आहे.
यावरुन सदरबाबत अन्न व औषध प्रशासन विभाग, गडचिरोलीचे अन्न सुरक्षा अधिकारी श्री.जितेंद्र कुंजाम यांच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन गडचिरोली येथे आरोपी : –
१) विवेक अवधराम गुप्ता वय,२१ वर्ष
२) अरविंद अवधराम गुप्ता,वय,३१ वर्ष
३) यश सुभाष चव्हाण वय,३१ वर्ष
४) अजय सतिश गेडाम वय,३१ वर्ष
५) अनिकेत घनश्याम बांबोळे वय,२७ वर्ष सर्व रा. गोकुलनगर ता.जि.गडचिरोली यांचेविरुध्द अपराध क्रमांक ८१०/२०२६ कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) भारतीय न्याय संहिता-२०२३ सहकलम – ५९(१), २६(२) (i), २६(२) (iv), २७ (३)(c), ३(१)(zz) (v) अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम-२००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येऊन पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि. कपिल आगलावे, पोस्टे गडचिरोली हे करीत आहेत. सदर कारवाई पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.एम.रमेश, अपर पोलीस (अभियान) श्री.कार्तिक मधिरा,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.गोकुल राज.जी.सहा.पोलीस अधीक्षक
गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन गडचिरोलीचे सहायक पोलीस निरीक्षक श्री. शरद मेश्राम, यांचे नेतृत्यात पोउपनि,अतुल तराळे, पोउपनि, प्रविण बुंदे व पोलीस अंमलदार यांनी पार पाडली.
error: Content is protected !!