Sunday, June 21, 2026
Home Chandrapur गुपचूप ” गुप्तधन ” शोधणाऱ्या टोळीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले ; तिघे जण...

गुपचूप ” गुप्तधन ” शोधणाऱ्या टोळीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले ; तिघे जण पोलिसांच्या ताब्यात..!

0
6

गुपचूप ” गुप्तधन ” शोधणाऱ्या टोळीला गावकऱ्यांनी रंगेहात पकडले ; तिघे जण पोलिसांच्या ताब्यात..!

सुकदर्शन वृतांत 

वरोरा : जिल्ह्यात वरोरा तालुक्यातील डोंगरगाव रेल्वे जवळच्या ” टाकळी ” येथील हनुमान मंदिरात गुप्तधन शोधण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका टोळीला स्थानिक शेतकऱ्यांनी रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या कारवाईत पोलिसांनी टोळीतील तिघांना ताब्यात घेतले असून, दोन जण पसार झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

टाकळी येथील हनुमान मंदिर प्राचीन असून, तेथे महादेवाची पिंडही आहे.हे मंदिर जागृत असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे.गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात काही संशयित लोकांची ये-जा सुरू होती.

गुप्तधनाच्या आमिषाने काही इसम मंदिराच्या परिसराची पाहणी करत होते. आठ दिवसांपूर्वीही त्यांनी येथे खोदकाम करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र अडथळ्यांमुळे तो प्रयत्न फसला होता.शेतकऱ्यांचा ” वॉच ” आणि कारवाई

गावकऱ्यांना या टोळीच्या संशयास्पद हालचालींची कुणकूण लागली होती. परिसरातील सतर्क शेतकऱ्यांनी या टोळीवर नजर ठेवली होती.१८ जून रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मारुती कारने ८ जणांचा ताफा मंदिरात दाखल झाला. मंदिरात पोहोचताच त्यांनी आधी पूजा-पाठ केला आणि त्यानंतर गुप्तधन काढण्यासाठी खोदकाम सुरू केले.

ही बाब सतर्क शेतकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने वरोरा पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस ताफा तातडीने घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपींनी पळ काढला, मात्र शेतकऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी तिघांना रंगेहात पकडले.

सध्या वरोरा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून,फरार आरोपींचा शोध घेत आहेत.गुप्तधनाच्या हव्यासापोटी प्राचीन वारसा असलेल्या मंदिराची तोडफोड करणाऱ्या या टोळीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!