Home Crime शिवनी येथील किरण ताडपल्लीवार शेतातील फार्म हाऊस वर धाड टाकून गडचिरोली पोलीसांनी...
शिवनी येथील किरण ताडपल्लीवार शेतातील फार्म हाऊस वर धाड टाकून गडचिरोली पोलीसांनी केला अवैधरित्या विक्री करीता साठवून ठेवलेला देशी दारु एकूण 1,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : दिनांक,19/06/2026) गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो, त्याविरुध्द पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री.एम.रमेश यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.
यावरुन दिनांक,17/06/2026 रोजी पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे व पोलीस अंमलदार यांनी मौजा शिवनी येथे धाड टाकून अवैद्य देशी-विदेशी दारूची साठवणूक करुन विक्री करणाया आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की, दिनांक,17/06/2026 रोजी सहा.पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे यांना गोपनिय बातमिदाराकडून माहिती मिळाली की,इसम नामे किरण शंकर ताडपल्लीवार रा.शिवनी ता.जि.गडचिरोली याने आपल्या शेतातील फार्म हाऊस येथे अवैधरित्या देशी दारु बाळगुन विक्री करीता साठा करून ठेवलेला आहे.
अशा मिळालेल्या माहितीवरुन सहायक पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे व त्यांच्या पथकाने पंचासमक्ष सदर घराची तपासणी केली असता, किरण ताडपल्लीवार याच्या शेतातील घरात जमिनीच्या आतमध्ये बनविलेल्या सिमेंट टाकीमध्ये पेटवून नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला अर्धवट जळालेला अवैद्य साठवून ठेवलेला देशी दारुचा साठा मिळून आला.
1) 90 एम.एल मापाचे अर्धवट जळालेले 2,000 नग निपा असा एकूण 1,00,000/- (अक्षरी एक लाख रुपये) रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेला आहे.
संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे गडचिरोली येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 0788/2026 कलम 65 (इ) म.दा.का. अन्वये फरार आरोपी नामे किरण शंकर ताडपल्लीवार वय 37 वर्षे रा. शिवनी ता.जि.गडचिरोली विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर फरार आरोपीचा शोध घेणे सुरु असून गुन्ह्राचा पुढील तपास सुरु आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.एम. रमेश,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.कार्तिक मधीरा,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री.गोकुल राज जी.यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री.अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पोस्टे गडचिरोली येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी पार पाडली.
error: Content is protected !!