Home Breaking News अवैद्यपणे जुगार खेळणाया 36 आरोपींवर कारवाई ; घटनास्थळावरुन 34 आरोपी ताब्यात ;...
अवैद्यपणे जुगार खेळणाया 36 आरोपींवर कारवाई ; घटनास्थळावरुन 34 आरोपी ताब्यात ; दोन आरोपी फरार
📍23 चार चाकी,05 दुचाकी व रोख रकमेसह एकूण 1,50,97,100/- रुपयांच्या मूद्देमाल जप्त
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : (दि.17/08/2026) गडचिरोली जिल्ह्रात अवैध व्यवसाय करणायांवर अंकुश बसावा या उद्देशाने पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.एम.रमेश यांचेकडून गडचिरोली जिल्ह्रातील अवैध व्यवसाय व जुगार इत्यादींवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें यांना देण्यात आले आहेत.
यावरुन आज दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कोटगुल पोलीसांकडून अवैध जुगार खेळणाया आरोपींवर कायदेशिर कारवाई करण्यात आलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, आज दिनांक, 17/08/2026 रोजी रात्री 02/00 वाजताचे सुमारास परमेश्वर लोहंबरे रा.नांगपूर, जि. गडचिरोली व मिथुन तांबेकर रा.कोटगुल, ता. कोरची जि.गडचिरोली हे मौजा नागपूर जि. गडचिरोली जंगल परिसरात बेकायदेशिररित्या काही इसमांना गोळा करुन ताश पत्त्यांच्या सहाय्याने अवैद्यपणे पेैसे लाऊन हार जितचा खेळ करीत आहे.
अशी गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोली येथील पोलीस पथकास मिळाली होती. सदर माहीतीवरुन स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे सपोनि. भगतसिंग दुल्हत व पोलीस पथक असे मौजा नांगपूर येथे पोहचून दोन पंचांसह जंगल परीसरात घटनास्थळी धाड टाकली असता,काही इसम हे बेकायदेशीररित्या 52 ताश पत्याच्या सहाय्याने पैशाची बाजी लाऊन जुगाराचा खेळ करताना दिसून आले.
पोलीसांची चाहूल लागताच काही इसम पळू लागले. यावेळी स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस पथक व पोलीस स्टेशन कोटगुल येथील पोउपनि. विवेक वायकर व पोलीस पथक यांनी प्रभावीपणे कारवाई करत घटनास्थळावर जुगार खेळणारे
1) बिरेंद्र कुमार एवनलाल सिन्हा वय 26 वर्षे, रा.कोटरासरार जि.राजनांदगाव (छ.ग)
2) प्रकाश कुमार शामलाल मेश्राम वय,50 वर्षे,रा. बजरंग मार्ग जि. राजनांदगाव (छ.ग.) यांच्यासह एकूण 34 आरोपी तसेच जुगार साहीत्य आणि रोख रक्कम ताब्यात घेतले आहेे.
घटनास्थळावरील आरोपींना सदर जुगार कुणी भरविल्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी 1) परमेश्वर लोहंबरे रा. नांगपूर, जि. गडचिरोली
2) मिथुन तांबेकर रा. कोटगुल जि.गडचिरोली यांच्या सांगण्यावरुन जुगार खेळण्यासाठी आल्याचे सांगितले.
यावेळी आरोपींच्या अंगझडती दरम्यान घटनास्थळावरुन 4,41,500/- रुपये रोख रक्कम तसेच 23 चार चाकी वाहने, 05 दुचाकी वाहने, जुगार खेळण्याचे पत्ते,स्टीलची पेटी, लाल रंगाटी बॅटरी, ताडपत्री असा एकूण 1,50,97,100/- रुपये किंमतीच्या मुद्देमालासह एकूण 34 आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
संबंधित घटनेच्या अनुषंगाने एकूण 36 आरोपीतांविरुध्द पोस्टे कोटगुल येथे अप क्र. 008/2026 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला असून पाहिजे असलेले आरोपी नामे
1) परमेश्वर लोहंबरे रा.नागपूर जि.गडचिरोली 2) मिथुन तांबेकर रा.कोटगुल, जि. गडचिरोली यांचा शोध घेणे सुरु आहे. गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि.विवेक वायकर, पोलीस स्टेशन कोटगुल हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.एम.रमेश यांच्या आदेशान्वये, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी.उपविभागीय पोलीस अधिकारी,कुरखेडा
श्री.प्रमोद मडामे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोनि. अरुण फेगडे, स्थागुशाचे सपोनि.भगतसिंग दुल्हत, पोहवा/सतीश कत्तीवार, पोअं/तुषार खोब्राागडे, बापू कुम्मरी तसेच पोस्टे कोटगुलचे पोउपनि. विवेक वायकर, सफौ/भजनराव कोडापे, पोअं/संदिप बागडे व किशोर बावणे यांनी केलेली आहे.
error: Content is protected !!