Saturday, August 15, 2026
Home Chandrapur अ-हेरनवरगांव येथे जि.प.प्राथ.शाळा,विकास विद्या,ग्रा.पं.कार्या,सेवा सहकारी सोसायटी व दुग्ध संस्था येथे ८० वा...

अ-हेरनवरगांव येथे जि.प.प्राथ.शाळा,विकास विद्या,ग्रा.पं.कार्या,सेवा सहकारी सोसायटी व दुग्ध संस्था येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा. अमरदीप लोखंडे सहसंपादक.

0
2

अ-हेरनवरगांव येथे जि.प.प्राथ.शाळा,विकास विद्या,ग्रा.पं.कार्या,सेवा सहकारी सोसायटी व दुग्ध संस्था येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

अमरदीप लोखंडे सहसंपादक.
ब्रह्मपुरी – १५/०८/२६ (अमरदीप लोखंडे –  सहसंपादक) ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक गोन्नाडे यांनी ग्रामपंचायत प्रशासिका दामिनी चौधरी , पुनम ठेंगरे,शाळा समिती अध्यक्ष संजय सहारे व सदस्य ,अकुल राऊत पोलीस पाटील, संजय जराते ,अंगणवाडी सेविका, कार्यकर्त्या गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले.
ध्वजारोहणानंतर बँड पथकाच्या तालावर ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणावरती विकास विद्यालय ,जिल्हा परिषद शाळा शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी , विद्यार्थिनी ग्रामपंचायत सदस्य- कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, ग्रामवासी, अंगणवाडी सेविका ,कार्यकर्त्या आरोग्य सेविका,वाचनालयातील विद्यार्थी, गावातील कबड्डीचे खेळाडू, कर्मचारी वृंद एकत्र गोळा झाले. 
 ग्रामपंचायत प्रशासिका दामिनी चौधरी यांनी उपसरपंच जितेंद्र क-हाडे व ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार प्रशांत राऊत, समस्त ग्रामवासी बंधू – भगिनी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले असता उपस्थितांनी ध्वजाला मानवंदना दिली.
ध्वजारोहण झाल्यानंतर विकास विद्यालयाच्या विद्यार्थीनी यांनी देशभक्ती गीता वरती नृत्य सादर केल्यानंतर जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी कुमारी मुस्कान रवींद्र क-हाडे हिचा प्रशासिका दामिनी चौधरी,पूनम ठेंगरे, संगमित्रा लोखंडे, जितेंद्र क-हाडे, ध्रुवा खोब्रागडे यांनी सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन गौरव केला. 
स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत पटांगण, तलाव देवस्थान , सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.वृक्षारोपण कार्यक्रमात प्रशासिका दामिनी चौधरी यांनी प्रथमता झाड लावून वृक्षारोपणाला सुरुवात केली. 
जितेंद्र क-हाडे उपसरपंच, पूनम ठेंगरे,अकुल राऊत पोलीस पाटील, वामनरावजी मिसार, प्रशांतदाणी , होमराज राऊत, प्रकाश ठाकूर, संजय जराते, उमेश कुथे,नवलाजी सोंदरकर, रमेश करंडे, डाकराम ठेंगरे पाटील ,जिल्हा परिषद शाळा कर्मचारी,वाचनालय ग्रुप, कबड्डी ग्रुप यांनी यावेळी वृक्षारोपण केले.
गावातील तरुण वर्ग,ग्रामवासी यांनी यावेळी मोलाचे सहकार्य केले.स्वातंत्र्य दिन कार्यक्रमाचे संचालन व आभार मंगेश पाथोडे शिक्षक यांनी पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!