Thursday, August 13, 2026
Home Chandrapur महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव भोसले येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन

महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव भोसले येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन

0
13

महाराष्ट्र विद्यालय, पिंपळगाव भोसले येथे माजी विद्यार्थी संघ स्थापन

अमरदीप लोखंडे, सहसंपादक.
ब्रम्हपुरी : दि.१२/०८/२६(अमरदीप लोखंडे – सहसंपादक) महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित ब्रह्मपुरी तालुक्यातील महाराष्ट्र विद्यालय,पिंपळगाव भोसले येथे दि.०८/ ऑगस्ट २६ ला माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले.या सभेचे अध्यक्ष विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेश नरहरी कऱ्हाडे होते. तर प्रमुख पाहुणे
 सुरेश दुनेदार सरपंच ग्रा. प. पिंपळगाव, रुपेश पुरी सर जेष्ठ शिक्षक ,शैक्षणिक सत्र २००१ते २००५मधील विद्यार्थी, विद्यार्थिनीं शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.या सभे मध्ये शासन परिपत्रक ०१ ऑक्टोबर २०२५ नुसार माजी विद्यार्थी शाळेकडून त्यांच्या झालेल्या घडणीची जाणीव ठेऊन शाळे बद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासात महत्वाचा हातभार लावू शकतात या उद्देशाने माजी विद्यार्थी संघा ची स्थापना करण्यात आली. या सभेचे प्रास्ताविक पुरी सर यांनी केले. 
सभेचे अध्यक्ष यांनी माजी विद्यार्थी संघ स्थापन करण्याची उद्दिष्टे व संघ स्थापनेची मार्गदर्शक तत्वे, विद्यार्थ्याकडून अपेक्षित कार्य यावर सविस्तर मार्गदर्शन केले.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली. 
अध्यक्ष – शरद वामनराव शेबे,उपाध्यक्ष – राकेश खुदाराम इंदूरकर,कोषाध्यक्ष- महेश केवळराम टिकले आणि इतर सदस्य यांची निवड करण्यात आली.शाळेतील मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून या सत्रा मध्ये वर्ग ०५ मध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वितरण माजी विद्यार्थ्यांच्या कार्यकारिणीच्या हस्ते करण्यात आले.
 सभेचे उत्कृष्ट संचालन महाले सर व आभार घ्यार सर यांनी उपस्थितांचे मानले .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!