Home Gadchiroli कुरखेडा तालुक्यातील टेकडीटोला येथे कपडे वाळवताना विजेचा तीव्र धक्का लागून महिलेचा मृत्यू.
कुरखेडा तालुक्यातील टेकडीटोला येथे कपडे वाळवताना विजेचा तीव्र धक्का लागून महिलेचा मृत्यू.
सुकदर्शन वृतांत
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील गुरनोली ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या टेकडीटोला येथे कपडे वाळवताना विजेचा तीव्र धक्का लागून प्रभा दिनकर मडकाम वय,45 वर्ष असे मृत महिलेचे नाव असून, रविवारी (दि.5) दुपारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
प्रभा मडकाम या नेहमीप्रमाणे घरकामात व्यस्त होत्या. कपडे धुतल्यानंतर ते वाळवण्यासाठी त्या घराशेजारील सार्वजनिक वीज खांबाच्या अर्थिंगसाठी वापरलेल्या तारेवर टाकत होत्या.दुर्दैवाने त्याच वेळी त्या तारेमध्ये विद्युत प्रवाह उतरला होता.कपडे तारेवर टाकताच त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला.
या धक्क्याची तीव्रता इतकी भीषण होती की त्या जागीच गंभीर जखमी झाल्या. घटनेची माहिती मिळताच उपस्थित ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी वेळ न घालवता त्यांना तातडीने चारचाकी वाहनातून कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
प्रभा मडकाम यांच्या निधनामुळे मडकाम कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पती आणि एक मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्त्या महिलेच्या आकस्मिक जाण्याने कुटुंबीय पूर्णपणे खचले असून त्यांच्यावर दुःखाचे सावट पसरले आहे.
घटनेची माहिती मिळताच भाजप तालुका अध्यक्ष तथा माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये यांनी रुग्णालयात धाव घेऊन शोकग्रस्त कुटुंबीयांचे सांत्वन केले.सध्या कुरखेडा पोलीस ठाण्यात या घटनेची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून,पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
error: Content is protected !!