Home Crime गडचिरोली पोलीसांची अवैद्य व्यवसायांविरोधात धडक कारवाई मागील चार महिन्यात विविध 1262 गुन्हे...
गडचिरोली पोलीसांची अवैद्य व्यवसायांविरोधात धडक कारवाई
मागील चार महिन्यात विविध 1262 गुन्हे दाखल होऊन एकूण 1533 आरोपी अटक तर एकूण 07 कोटी 99 लाखांचा मुद्देमाल जप्त
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : (दिनांक,03/09/2026 गुरुवार) गडचिरोली जिल्ह्रात अवैधरीत्या दारु, अमली पदार्थ, प्रतिबंधित सुगंधित तंबाखूची विक्री व वाहतुक अशा अवैध व्यवसाय करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.एम.रमेश यांनी दिलेले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, युवकांना अमली पदार्थांपासुन दुर ठेवणे तसेच समाजकंटकांच्या बेकायदेशीर कारवायांवर प्रभावी आळा घालण्याच्या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलामार्फत सातत्याने विशेष धडक मोहीमा राबविण्यात येत आहे.
याअनुषंगाने पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली मागील चार महिन्यांपासून अवैध दारु, सुगंधी तंबाखू, अमली पदार्थ आणि जुगार या अवैध व्यवसायांविरुद्ध व्यापक व नियोजनबद्ध कारवाया करण्यात येत आहेे.
स्थानिक गुन्हे शाखा तसेच जिल्ह्रातील विविध पोलीस स्टेशनच्या पथकांनी अनेक ठिकाणी धाडी टाकून मोठ्या प्रमाणावर अवैध मुद्देमाल जप्त केला असून संबंधित आरोपींविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
एकंदरीत या काळात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने गुन्हेगारांच्या विरोधात एकूण 1262 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1533 आरोपी अटक तर 7 कोटी 99 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
यामध्ये गेल्या चार महिन्यांच्या काळात अवैध दारु विक्री व वाहतुकीच्या संबंधाने जिल्हाभरात एकूण 1178 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1330 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. यासोबतच 4 कोटी 72 लाख रुपयांचा अवैद्य दारुचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
यासोबचत अवैध सुगंधित तंबाखू विक्री व वाहतुकीच्या अनुषंगाने एकूण 17 गुन्हे दाखल करण्यात आले असून 28 आरोपींना अटक तर 53 लाख 64 हजार रुपयांचा अवैध सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. तसेच अमली पदार्थाचे उत्पादन करुन विक्री व वाहतुक करणायांच्या विरोधात एकूण 13 गुन्हे दाखल करण्यात आले असून 08 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
तसेच एकूण 96 लाख 42 हजार रुपयांचा अवैध अमली पदार्थाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अवैध जुगार खेळणायांच्या विरोधात एकूण 54 गुन्हे दाखल करण्यात आले असून 167 आरोपीतांना अटक तर 1 कोटी 77 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.
यासोबतच मागील चार महिन्यात अवैध दारु विक्री, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण करणे तसेच इतर गंभीर स्वरुपाचे विविध गुन्हे केलेल्या अशा 12 सराईत गुन्हेगारांच्या विरोधात मा. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांच्याकडे हद्दपार प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत.
यावेळी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.एम.रमेश यांनी सांगितले आहे की, ‘गडचिरोली जिल्ह्रात अवैध व्यवसाय करणायांविरोधात कठोर कारवाई करण्यात येत असून अशा प्रवृत्तींविरुद्ध भविष्यातही सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार आहे.
” गुन्हेगारीमुक्त,व्यसनमुक्त आणि सुरक्षित गडचिरोली’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन गडचिरोली पोलीस दल नागरिकांच्या सहकार्याने कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सदैव कटिबद्ध आहे.’
error: Content is protected !!