Monday, September 14, 2026
Home Chandrapur शिस्तबद्ध व तज्ज्ञ प्राध्यापक महाविद्यालयाचा सन्मान : अँड प्रकाश भैया : निरोप...

शिस्तबद्ध व तज्ज्ञ प्राध्यापक महाविद्यालयाचा सन्मान : अँड प्रकाश भैया : निरोप व सत्कार समारंभ 

शिस्तबद्ध व तज्ज्ञ प्राध्यापक महाविद्यालयाचा सन्मान : अँड प्रकाश भैया : निरोप व सत्कार समारंभ 

अमरदीप लोखंडे सहसंपादक.
ब्रम्हपुरी – ०१/०९/२६ ” कोणत्याही विषयाचा प्राध्यापक हा आपल्या विषयात तज्ज्ञ असावा लागतो.ज्ञान हे प्रवाही असले पाहिजे.अनेक पिढया आपल्या हातून घडतात.डाॅ.खाजगीवाले वाणिज्य विषयात पारंगत होते,असे शिस्तबद्ध व तज्ज्ञ प्राध्यापक महाविद्यालयाचा सन्मान असतो.”असे विचार नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अँड.प्रकाश भैयांनी मांडले.
ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील डॉ.अजित खाजगीवाले यांच्या निरोप व सत्कार समारंभात बोलत होते.विचारपीठावर अध्यक्षस्थानी कार्य.प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे सहसचिव अँड भास्करराव उराडे,ज्येष्ठ सदस्य प्रा.सुभाष बजाज, पर्यवेक्षक प्रा.आनंद भोयर, समिती अध्यक्ष डॉ.धनराज खानोरकर व सत्कारमूर्ती डॉ.अजित खाजगीवाले, सौ.प्रिती खाजगीवाले उपस्थित होते.
यावेळी पाहूण्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, भेटवस्तू देऊन सत्कारमूर्तीचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यानंतर पाहूण्यांनी डॉ खाजगीवाले यांच्या व्यक्तित्वाचे पैलू उलगडले.
 प्रास्ताविक व पाहूण्यांचा परिचय समिती अध्यक्ष डॉ. धनराज खानोरकर, संचालन डॉ.वर्षा चंदनशिवे तर आभार प्रा.निलिमा रंगारीनी मानले. यशस्वीतेसाठी प्रा.अजय खोब्रागडे,प्रा.मेंघरे,प्रा.पराते, प्रज्ञा मेश्राम,विलास खोब्रागडे इत्यादींनी सहकार्य केले.
error: Content is protected !!