Home Chandrapur गरिबीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तीन विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून मारली उंच भरारी
गरिबीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत तीन विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून मारली उंच भरारी
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी : (अमरदीप लोखंडे सहसंपादक) दि,०१/०९/२६ नुकत्याच शिक्षक पदाच्या जाहीर झालेल्या निवड यादीत ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथील मंगेश जराते,अमित मलगाम आणि विपुल खोब्रागडे या तीन हिऱ्यांनी घरच्या गरिबीच्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत ग्राम वाचनालय,अ-हेरनवरगांव येथे अहो रात्र स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून टीईटी परीक्षेत यश संपादन केले आणि शिक्षक पदाच्या निवड यादीत आपले नाव समाविष्ट केले.
मंगेश जराते भंडारा जिल्हा, अमित मलगाम लातूर जिल्हा व विपुल खोब्रागडे चंद्रपूर जिल्हा या ठिकाणी ते शिक्षक म्हणून रुजू होणार आहेत.या तीनही शिक्षकांच्या घरची परिस्थिती गरिबीची.मनगटात जोर आणि मनात महत्त्वकांक्षा प्रबळ असेल तर यश निश्चितच प्राप्त करता येते हे यांनी सिद्ध करून दाखविले.
शिक्षक म्हणून निवड झाल्याबद्दल या तिघांचाही सत्कार व अभिनंदन अभियंता आकाश खोब्रागडे, अभियंता प्रथम अमरदीप लोखंडे आणि सुरेश बनकर व गायन पार्टी यांनी पुष्पगुच्छ व शाल देऊन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.तसेच स्वकीय आप्तपरिवार, मित्रपरिवार, ग्रामस्थ यांनी सुद्धा त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला.
error: Content is protected !!