Monday, September 14, 2026
Home Chandrapur रजत वैद्य याने २१ किलोमीटर मॅरेथॉन धावण्याच्या शर्यतीत फिनिशर पदक व प्रमाणपत्र...

रजत वैद्य याने २१ किलोमीटर मॅरेथॉन धावण्याच्या शर्यतीत फिनिशर पदक व प्रमाणपत्र प्राप्त करून वाजविला डंका

रजत वैद्य याने २१ किलोमीटर मॅरेथॉन धावण्याच्या शर्यतीत फिनिशर पदक व प्रमाणपत्र प्राप्त करून वाजविला डंका

अमरदीप लोखंडे सहसंपादक.
ब्रम्हपुरी : ३० ऑगस्ट २६ ला गोंदिया येथे पार पडलेल्या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत ट्रॅक अँड फील्ड क्लब चा विद्यार्थी व अ-हेरनवरगांव येथील स्पोर्टिंग क्लबचा प्रशिक्षक रजत श्रीहरी वैद्य याने ओपन वयोगटात२१ किलोमीटर अंतर एक तास ४८ मिनिटात पूर्ण करून फिनिशर(शेवट करणारा) पदक व प्रमाणपत्र प्राप्त केले.त्याने सातत्यपूर्ण सराव ,मेहनत आणि पाडलेली शिस्त यामुळेच यश संपादन केले.
त्याने मिळविलेल्या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार, क्लबचे पदाधिकारी ,ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन व कौतुक केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!