Tuesday, October 13, 2026
Home Chandrapur दीन – दलितांचा बुलंद आवाज म्हणजे अण्णा भाऊ साठे. – अशोक भैया 

दीन – दलितांचा बुलंद आवाज म्हणजे अण्णा भाऊ साठे. – अशोक भैया 

दीन – दलितांचा बुलंद आवाज म्हणजे अण्णा भाऊ साठे. – अशोक भैया 

सुकदर्शन वृतांत 
ब्रह्मपुरी – ०१/०८/२६(अमरदीप लोखंडे – सहसंपादक) समाजातील दीन – दलितांच्या बाजूने आपल्या शाहिरीतून व साहित्यातून अण्णा भाऊंनी आवाज उठविला.अण्णा भाऊचे विपुल साहित्य हे सामाजिक उत्थानासाठी होते,तो दीन -दलितांचा बुलंद आवाज होता असे विवेचन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैयांनी केले.ते ने.हि. महाविद्यालयात लोकशाहिर अण्णा भाऊ साठे जंयतीनिमित्त बोलत होते.
   सर्वप्रथम संस्थासचिव अशोक भैया व प्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांनी अण्णा भाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.यानंतर उपस्थित डॉ रेखा मेश्राम,प्रा विनोद नरड,अधीक्षक संगीता ठाकरे,डॉ रतन मेश्राम, डॉ सुनिल चौधरी,डॉ युवराज मेश्राम ,डॉ कुलजित शर्मा, डॉ राजू आदे,डॉ विवेक नागभीडकर,आलोक मेश्राम,रोशन डांगे इत्यादी मान्यवरांनी फोटोला पुष्प वाहून आपली आदरांजली वाहिली.
    यानिमित्ताने ग्रंथालयात अण्णा भाऊ साठेंच्या ग्रंथांची प्रदर्शनी लावण्यात आली होती व विद्यार्थ्यांसाठी ‘ लोकशाहिर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे’ निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली.संचालन व आभार डॉ युवराज मेश्रामांनी केले.
error: Content is protected !!