Tuesday, October 13, 2026
Home Breaking News सावली तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सामदा (दागोबा परिसरात) आज वाघाच्या हल्ल्यात एका...

सावली तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सामदा (दागोबा परिसरात) आज वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

सावली तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सामदा (दागोबा परिसरात) आज वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

सुकदर्शन वृतांत 
सावली : सावली तालुक्यातील सावली वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या सामदा (दागोबा परिसरात) आज वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.मृत शेतकऱ्याचे नाव हिरामण साखरे वय,62 वर्ष रा.सामदा) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिरामण साखरे हे आपल्या शेतातील कामासोबत गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
विशेष म्हणजे, याच परिसरात महिनाभरापूर्वी रानटी हत्तीच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.त्या घटनेनंतर आता पुन्हा वाघाच्या हल्ल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच सावली वन विभागाचे अधिकारी व सावली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.रानटी हत्तीच्या दहशतीनंतर आता वाघाच्या वावरामुळे सामदा,सोनापूर व परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठी भीती पसरली आहे.
वन विभागाने तातडीने वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेची उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
error: Content is protected !!