कोटी- कोरनार येथील पूल बांधकामात मोठया प्रमाणात भ्रष्टाचार,सा.बा.विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे यांच्यावर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्याची मागणी.
📍देवेंद्रजी फडणवीस मूख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री गडचिरोली जिल्हा यांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे निवेदन.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालूक्यातील कोठी – कोरनार येथील अवघ्या तीन वर्षात बांधलेला पूल कोसळल्याबाबत जबाबदार अधीकारी म्हणून सार्व.बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभीयंता निता ठाकरे यांची सखोल चौकशी करून फौजदारी गून्हा दाखल करणेbबाबत युवा ग्रामीण पत्रकार संघटना गडचिरोली यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.
सदर निवेदनात गडचिरोली जिल्हा हा अतीमागास , डोंगराळ व दूर्गम भागात वसलेला आहे. गडचिरोली जिल्हा संम्पूर्ण भारतात अतीमागास म्हणून ओळखल्या जातो. तसेच भारतातून गडचिरोली जिल्हयाचा मानव निर्दशांकात शेवटचा जिल्हा म्हणून गणल्या गेलेला आहे. आपणास या सगळया गोष्टींची अंत्यभूत माहीती आहे त्यामूळेच गडचिरोली जिल्हयाचा विकासाचे शस्त्र आपण आपल्या हातात घेतले त्यामूळेच आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे व राहील .
पंरतू येथील काही अधीकारी आपल्या पूर्ण विश्वासाचा गैर फायदा घेत आहे.गडचिरोली जिल्हयात दळणवळणाच्या सूवीधा अपू-या असल्याने जील्हावासीयांना खूप त्रासाला सामोरे जावे लागत होते.त्यामूळे आपल्या पूढाकाराने महाराष्टू आणी छतीसगडला जोडणा-या बांडीया नदीवर गडचिरोली जील्हयात एटापली तालूक्यातील कोठी- कोरणार येथे पूलाचे बांधकाम मंजूर करण्यात आले.
व सदर पूलाचे भूमीपूजन दिनांक १५ ऑगष्ट २०२३ ला आपल्या हस्ते करण्यात आले.सदर पूल अवघ्या तीन वर्षातच निकृष्ट बांधकामामूळे पूलाचे पील्लर खचून पूलीया जमीनदोस्त झाला. कोठी – कोरणार पूल अल्पावधीतच कोसळल्याने बांधकामाच्या गूणवत्तेवर प्रश्नचिन्ह नीर्माण झालेले आहे.
त्यामूळे सार्वजनीक बांधकाम विभागाची पर्यायाने शासनाची नाचक्की झालेली आहे. सदर पूलाचे बांधकाम निकृष्ठ होण्यामागे सार्व. बांधकाम विभागाच्या गडचीरोली येथील अधीक्षक अभीयंता निता ठाकरे हया सर्वस्वी जबाबदार आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
अहेरी तालूक्यातील आलापल्ली विभागात सध्या ५०० कोंटी रूपयापेक्षा अधीक अश्याच प्रकारे पूल व रस्यांची कामे सूरू आहेत. बांडीया नदीवरील पूल कोसळल्याने कामांच्या गूणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहेत. तथापी कोठी कोरणार येथील पूल उभारतांना ऐनवेळी पूलीयाचे डीझाइन बदलविण्यात आले.
अशी धक्कादायक माहीती देखील आहे. कोटयावधी रूपये खर्च करून उभारलेली पायाभूत सूवीधा अल्पावधीतच टीकत नसेल तर सूरू असलेल्या कामाच्या गूणवत्त्तेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी . तसेच महोदय गडचीरोली जील्हयात निकृष्ठ कामासाठी सार्व. बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभीयंता नीता ठाकरे हया सर्वस्वी जबाबदार आहेत.
तरी महोदय आपणास विनंती करण्यात येते कि, अवघ्या तीन वर्षात बांधलेला पूल कोसळल्याबाबत जबाबदार अधीकारी म्हणून सार्व. बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभीयंता निता ठाकरे व त्यांच्या गैरमार्गाने जमवलेल्या मालमत्तेची चौकशी करून फौजदारी गून्हा दाखल करणे बाबत निवेदन जिल्हाधिकारी मार्फत देण्यात आले.
यावेळी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे जिल्हाअध्यक्ष मधुकर गोंगले, जिल्हा सल्लागार भीमराव वनकर, जिल्हा सचिव फुलचंद वाघाडे,संघटनेचे पत्रकार बांधव उपस्थित होते. संबंधित अधिकारी यांच्यावर चौकशी करून कारवाई करण्यासाठी आपणास विनंती करण्यात येत आहे.






