शिष्यवृत्ती परीक्षेत सौम्या बिंजवेचे यश.
सुकदर्शन वृतांत
ब्रह्मपुरी – ३०/०७/२६(अमरदीप लोखंडे – सहसंपादक) प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) 2026 या परीक्षेत लोकमान्य टिळक प्राथमिक शाळा, ब्रह्मपुरी या शाळेतील इयत्ता चवथी ची विद्यार्थिनी सौम्या संजय बिंजवे हिने यश संपादन केले आहे.
26 एप्रिल 2026 ला घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत या शाळेतून एकूण 40 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी सौम्या बिंजवे हिने प्राविण्य प्राप्त करत शाळेचे नाव मोठे केले असून तिचे सर्वत्र कौतुक आणि अभिनंदन केले जात आहे.
या यशाकरिता सौम्याने वर्गशिक्षिका कविता लुटे मुख्याध्यापक दोनाडकर आणि आईवडिल यांना श्रेय दिले.
error: Content is protected !!