खेडी येथील ऋतुजा कोरेवार हिचे नीट परीक्षेत घवघवीत यश.
सुकदर्शन वृतांत
सावली : तालुक्यातील खेडी येथील कु. ऋतुजा विजय कोरेवार हिने राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-UG 2026) मध्ये ५६२ गुण मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तिच्या या यशामुळे खेडी गावासह संपूर्ण सावली तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
ऋतुजा ही पंचायत समितीचे माजी सभापती विजय कोरेवार यांची मुलगी असून ऋतुजाने सातत्यपूर्ण अभ्यास, कठोर परिश्रम आणि पालक व शिक्षकांच्या मार्गदर्शनाच्या बळावर हे यश मिळवले आहे. तिच्या या यशाबद्दल विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
ऋतुजा कोरेवार हिच्या या यशामुळे वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने तिने महत्त्वाचे पाऊल टाकले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित मानल्या जात आहे.तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस सर्व स्तरांतून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
error: Content is protected !!