Home Gadchiroli टेक फोर्स सर्व्हिसेस उत्सव – २०२६ उत्साहात संपन्न ; कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव....
टेक फोर्स सर्व्हिसेस उत्सव – २०२६ उत्साहात संपन्न ; कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव.
📍प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्त्वाचे असून भविष्यातही एकजुटीने कार्य करून नवे यश संपादन करण्याचे आवाहन. – कृणाल इटणकर संस्थापक,टेक फोर्स सर्व्हिसेस
सुरेश कन्नमवार – मुख्य संपादक
नागपूर : पेंच खवासा (मध्य प्रदेश), दि.१८ जुलै : टेक फोर्स सर्व्हिसेस तर्फे १७ व १८ जुलै २०२६ रोजी द इन्फिनिटी पेंच रिसॉर्ट,आवारघनी, टुरिया गेट,पेंच खवासा (मध्य प्रदेश) येथे ” टेक फोर्स उत्सव – २०२६ ” मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला.
” सेलिब्रेशन – इनोव्हेशन – अचिव्हमेंट – ग्रोथ” या संकल्पनेवर आधारित या दोन दिवसीय कार्यक्रमात कंपनीच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला तसेच उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.
यावेळी कंपनीच्या प्रगतीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांना “Employee Appreciation Letter” प्रदान करून सन्मानित करण्यात आले. कर्मचाऱ्यांचे सातत्यपूर्ण सहकार्य, समर्पण, टीमवर्क, मेहनत आणि सकारात्मक कार्यपद्धतीमुळे टेक फोर्स सर्व्हिसेसने यशाची नवी शिखरे गाठल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
” टेक फोर्स सर्व्हिसेसचे संस्थापक कृणाल प्रकाश इटणकर यांनी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या कार्याचा गौरव केला.कंपनीच्या यशामागे प्रत्येक कर्मचाऱ्याचे योगदान महत्त्वाचे असून भविष्यातही एकजुटीने कार्य करून नवे यश संपादन करण्याचे आवाहन त्यांनी केले. “
यावेळी संस्थापक कृणाल प्रकाश इटणकर यांच्यासह कर्मचारी अमन वऱ्हाडे, शशांक कापसे,संजय चौरे,अनिल जगताप
सुरेश कन्नमवार,देवानंद कन्नावार,अमोल वंजारी,हसीब, हिमांशू,भूषण, नितेश, राज, स्वप्नील,कौशिक ठाकरे,उमेश,अभय,चेतन रामटेककर
चेतन देवघरेदर्शन तरारे, जितेंद्र राठोड, श्रेयांशु पाल,सौरभ मेहरकर,चेतन फुसे,प्रदीप रायकवार,अशोक क्षीरसागर
विशाखा रहागंडाले,प्राजक्ता घोडेस्वार, वैष्णवी भुयारकर,काजल वानधरे,मयुरी,अश्विनी,नबा रझा,रुचिका,प्रिया आणि रितू उपस्थित होते.
स्वच्छ ऊर्जा,शाश्वत भविष्य,टीमवर्क व एकता, प्रगती व उत्कृष्टता तसेच बांधिलकी व विश्वास या मूल्यांवर कार्य करणारी टेक फोर्स सर्व्हिसेस ” सूर्यापासून सॉकेटपर्यंत – अखंड सेवा ” या ब्रीदवाक्यासह ग्राहकांना गुणवत्तापूर्ण सेवा देत असून,या उत्सवामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आणि भविष्यात अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प सर्वांनी व्यक्त केला.
error: Content is protected !!