Thursday, July 30, 2026
Home Breaking News कोरची तालुक्यातील कोसमी येथे मांत्रिकाचा आधार घेतल्याने एका 27 वर्षीय विवाहितेचा मृत्यू

कोरची तालुक्यातील कोसमी येथे मांत्रिकाचा आधार घेतल्याने एका 27 वर्षीय विवाहितेचा मृत्यू

0
16

कोरची तालुक्यातील कोसमी येथे मांत्रिकाचा आधार घेतल्याने एका 27 वर्षीय विवाहितेचा मृत्यू

सुकदर्शन वृतांत 
कोरची : प्रसूतीवेदना सुरू झाल्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल होण्याऐवजी मांत्रिकाचा आधार घेतल्याने एका 27 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कोरची तालुक्यातील कोसमी येथे सोमवारी (दि. 13) घडली. उपचारासाठी विलंब झाल्याने प्रसूतीनंतर काही मिनिटांतच तिचा मृत्यू झाला.
नवजात बालिकेचे प्राण वाचले असून तिच्यावर जिल्हा महिला व बालरुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेने दुर्गम भागात अंधश्रद्धेचा पगडा आणि आरोग्याविषयीची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली आहे.अमरिका महेश मडावी वय,27 रा.कोसमी ता. कोरची असे मृत महिलेचे नाव आहे.ही त्यांची तिसरी प्रसूती होती. 
प्रसूतीची संभाव्य तारीख जवळ आल्याने आरोग्य विभागाने त्यांना आधीच रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला होता.प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतरच दवाखान्यात जाण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला.
उपचार सुरू होईपर्यंत उशीर सोमवारी त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी कुटुंबीयांनी मांत्रिकाचा सल्ला घेतल्याने मौल्यवान वेळ वाया गेला.परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात आल्यानंतर आशा सेविका ललेश्री काटेंगे यांनी तत्काळ ” 108 ” रुग्णवाहिका बोलावून त्यांना उपचारासाठी रवाना केले.उपचार सुरू होईपर्यंत उशीर झाल्याने त्यांचा जीव वाचू शकला नाही.
प्रकृती अधिक खालावल्याने अमरिका मडावी यांना जिल्हा महिला व बालरुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे मंगळवारी पहाटे सुमारे 5:00.वा.2 किलो 600 ग्रॅम वजना च्या बालिकेचा जन्म झाला. नवजात बालिका सुरक्षित असली तरी प्रसूतीनंतर काही मिनिटांतच अमरिका यांचे निधन झाले.एका बाजूला नवजात बालिकेच्या आगमनाचा आनंद,तर दुसरीकडे मातेच्या निधनामुळे रुग्णालय परिसरात शोककळा पसरली.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ.विनोद मडावी यांनी सांगितले की,प्रसूतीची तारीख जवळ आल्याने आरोग्य कर्मचाऱ्यांनी वारंवार रुग्णालयात भरती होण्याचा सल्ला दिला होता.वेळेत उपचार मिळाले असते तर आईचे प्राण वाचण्याची शक्यता होती.उपचारासाठी उशिरा आणल्याने गुंतागुंत वाढली.
अमरिका यांचा विवाह 2022 मध्ये महेश मडावी यांच्याशी झाला होता.शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या दाम्पत्याला साडेतीन वर्षांची रिया,अडीच वर्षांचा रितेश आणि आता जन्मलेली नवजात बालिका अशी तीन अपत्ये आहेत. आईच्या अकाली निधनामुळे तिन्ही लेकरांवर मातृछत्र हरपल्याची शोकांतिका ओढवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!