Thursday, July 30, 2026
Home Breaking News शाब्दिक वादातून युवकाची हत्या धानोरा तालुक्यातील राजोली येथील घटना,शेतातील झुडपात आढळला मृतदेह

शाब्दिक वादातून युवकाची हत्या धानोरा तालुक्यातील राजोली येथील घटना,शेतातील झुडपात आढळला मृतदेह

0
24

शाब्दिक वादातून युवकाची हत्या धानोरा तालुक्यातील राजोली येथील घटना,शेतातील झुडपात आढळला मृतदेह

सुकदर्शन वृतांत 
धानोरा : दि.15 धानोरा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राजोली येथील शेतालगतच्या झुडपामध्ये एका अज्ञात युवकाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धानोरा मुख्यालयापासून अवघ्या 6 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या कठानी नदीवरील रेती स्टॉक पॉईंटजवळ ही घटना घडली.15 जुलै रोजी सकाळी 10.30 ते 11 वाजेच्या सुमारास स्थानिक शेतकऱ्यांना हा मृतदेह दिसून आला. शाब्दिक वादातून या युवकाची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.
​घटनेची माहिती मिळताच चातगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. आबाजी निकेसर आणि राजेंद्र निकोडे यांच्या शेताच्या बांधावरील झुडपातून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला. रेती डम्पिंग स्टेशनपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर ही घटना घडल्याने पोलिसांनी परिसरातील नागरिकांची व कामगारांची चौकशी सुरू केली आहे.
​                                                                     या संदर्भात रेती स्टॉक पॉईंटच्या लिलावधारकाकडे चौकशी केली असता,नागपूरवरून काल रेती भरण्यासाठी एक टिप्पर आले होते.या टिप्परचा चालक आणि क्लिनर यांच्यात काही कारणावरून वाद झाला होता,अशी माहिती समोर आली आहे.या शाब्दिक वादाचे कृत्य हत्येत झाले असावे, असा पोलिसांचा अंदाज असून मयताची ओळख पटवण्याचे व पुढील तपास करण्याचे काम पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!