Home Chandrapur जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चांदली (बुज) येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चांदली (बुज) येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न.
सुकदर्शन वृतांत
सावली : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा,चांदली (बुज) ता. सावली जि.चंद्रपूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६ – २७ चा शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात संपन्न झाला.कार्यक्रमास माननीय श्री.प्रदीप पुल्लरवार (पोलीस निरीक्षक, सावली),श्री.चिंतामण बालमवार (पोलीस पाटील, चांदली बुज)
श्री.अनिल अमृतवार (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, चांदली बुज), सौ. एडनुतलवार मॅडम (मुख्याध्यापिका) तसेच श्री. जेंगठे सर (नवनियुक्त मुख्याध्यापक, जि.प. उच्च प्राथमिक शाळा,चांदली बुज) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवृंद, विद्यार्थी, विद्यार्थी मित्र, पालक, माता-पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व शैक्षणिक साहित्य देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित शाळेत उपस्थिती, शिस्त, संस्कार, स्वच्छता आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व पटवून दिले. तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून आपल्या पालकांचे, गावाचे व देशाचे नाव उज्ज्वल करावे,असे आवाहन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या शिक्षकवृंदाने उत्कृष्टरीत्या केले. उपस्थित पालक व ग्रामस्थांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झालेल्या या प्रवेशोत्सवामुळे नवागत विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आनंद व आत्मविश्वास निर्माण झाला.
error: Content is protected !!