Friday, July 31, 2026
Home Breaking News साल्याच्या पत्नीवर अत्याचार करण्याचा नीच प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भंगाराम (तळोधी) उघडकीस....

साल्याच्या पत्नीवर अत्याचार करण्याचा नीच प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भंगाराम (तळोधी) उघडकीस. ​📍 पोलीस ठाण्यात तक्रार न करता ” ते ” वापस का गेले ? ; गावातल्या कोणत्या ” प्रतिष्ठित ” आणि राजकीय दबावाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला ?

0
40

साल्याच्या पत्नीवर अत्याचार करण्याचा नीच प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना भंगाराम (तळोधी) उघडकीस.

​📍 पोलीस ठाण्यात तक्रार न करता ” ते ” वापस का गेले ? ; गावातल्या कोणत्या ” प्रतिष्ठित ” आणि राजकीय दबावाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला ?

सुकदर्शन वृतांत 
गोंडपिपरी : चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यामध्ये असलेल्या भंगाराम तळोधी गावातून सध्या एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक चर्चा समोर येत आहे. एका हरामखोर प्रवृत्तीच्या व्यक्तीने नातेसंबंधांना काळिमा फासत आपल्याच साल्याच्या पत्नीवर अत्याचार करण्याचा नीच प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट पसरली असली, तरीही पोलीस ठाण्यात तक्रार करायला गेलेले पीडित कुटुंब अचानक वापस का फिरले ? आणि यामध्ये नेमकं कुणाचं पाणी मुरत आहे ? असा रोखठोक प्रश्न आता जनता विचारत आहे.विस्तृत वृत्त असे की,गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी हे गाव बाजारपेठेच्या नावाने नेहमीच सर्वत्र चर्चेत असते.
यावेळी हे गाव एका क्रूर आणि अत्यंत लाजिरवाण्या कृत्यामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने गावातील नागरिक आणि घरातील सर्व सदस्य आपापल्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेले होते. घरात केवळ पीडित महिला एकटीच होती.तर दुसरीकडे, पीडित महिलेचे सासरे हे बकऱ्या चारण्यासाठी जंगलात (वनामध्ये) गेले होते.
​घर सामसूम असल्याचा आणि याच संधीचा गैरफायदा घेत तालुक्याशी संबंधित एका सत्ताधारी प्रतिष्ठित महिलेच्या पतीने अत्यंत नीच कृत्य करण्याचे ठरवले. तो थेट पीडित महिलेच्या घरात घुसला आणि त्याने आतून दरवाजाची कडी लावून घेतली. त्याने पीडितेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला,.
त्याच वेळी दैव बलवत्तर म्हणून तिचे सासरे अचानक घरात वापस आले.सासरा वेळेवर आल्याचे पाहून त्या नराधमाचे धाबे दणाणले आणि पुढील अनर्थ टळला.या भयानक प्रसंगानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवून गावातील काही प्रतिष्ठित व्यक्तींना व नातेवाईक यांना सोबत घेतले आणि न्याय मिळवण्यासाठी ती थेट पोलीस स्टेशन गाठली.
पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पीडित महिला आणि गावकरी गेले खरे त्यानंतर नक्की काय शिजले ? कोणती गुप्त बैठक झाली ? की काय घडले, ज्यामुळे तक्रार न करताच ते लोक वापस गेले, हा सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
​ जनतेचा थेट सवाल : – जर इतका मोठा गुन्हा घडला होता, तर गावातल्या कोणत्या ” प्रतिष्ठित ” आणि राजकीय दबावाने हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला ? नातेसंबंधांची दुहाई देऊन की पैशांच्या आणि सत्तेच्या बळावर पीडितेचे तोंड बंद करण्यात आले ?
​एकीकडे महिला सुरक्षेच्या मोठ्या गप्पा मारल्या जातात, तर दुसरीकडे पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावरून तक्रारदार वापस जात असताना प्रशासन मूग गिळून का बसले आहे? या प्रकरणात कायद्याचा धाक उरला आहे की नाही, अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात रंगत आहे. गावातल्या काही बड्या धेंडांनी आणि नातेसंबंधातील मध्यस्थांनी मिळून हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्येच दाबल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी होणार की नेहमीप्रमाणे गरिबाच्या अब्रूचा सौदा करून हे प्रकरण कायमचे दडपले जाणार ? याकडे आता संपूर्ण गोंडपिपरी तालुक्याचे लक्ष लागले आहे. दोषींवर आणि हे प्रकरण दाबणाऱ्यांवर कडक कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी दबक्या आवाजात जोर धरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!