Home Crime गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 6,00,000/- रुपयांचा मुद्देमाल...
गडचिरोली पोलीसांनी केला अवैध दारु व चारचाकी वाहनासह एकूण 6,00,000/- रुपयांचा मुद्देमाल जप्त.
सुकदर्शन वृतांत
देसाईगंज (वडसा) : दिनांक,22/06/2026 गडचिरोली जिल्हयात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक करण्याचा प्रयत्न केला जात असतो. त्याविरुध्द पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री. एम.रमेश यांचे अवैध दारु विक्री करणायांवर प्रभावीपणे कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत.यावरुन काल दिनांक 21 जून 2026 रोजी पोस्टे देसाईगंज पोलीस पथकाने सापळा रचून अवैद्य देशी-विदेशी दारूची वाहतुक करणाया आरोपीविरुध्द कारवाई केलेली आहे.
सविस्तर वृत असे आहे की,काल दिनांक 21 जून 2026 रोजी पोस्टे देसाईगंज येथील सपोनि. एस. आगरकर यांना गोपनिय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, एक अज्ञात इसम ब्राम्हपुरी ते देसाईगंज मार्गाने सिल्वर रंगाच्या मारुती सुझुकी रिट्झ चारचाकी वाहन क्र. एम.एच.20 बी.सी. 8161 या चारचाकी वाहनाने अवैधरित्या देशी-विदेशी दारुची वाहतूक करणार आहे.
अशा मिळालेल्या माहितीवरुन पोस्टे देसाईगंज येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी ब्राम्हपुरी ते देसाईगंज जवळील वैनगंगा नदीकाठाजवळ सापळा रचला असता, मिळालेल्या माहितीप्रमाणे ब्रम्हपुरी कडून देसाईगंज रोडच्या दिशेने एक सिल्वर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची रिट्झ चारचाकी वाहन क्र.MH.20 BC.8161 वाहन संशयास्पदरित्या येताना दिसून आली.
यावरून पोलीस पथकाने रस्त्यात तात्पुरता अडथळा निर्माण करून वाहन चालकास हात दाखवून थांबण्याचा ईशारा केला.यानंतर वाहन चालकाने वाहन रस्त्याच्या बाजुला थांबविल्यानंतर पोलीसांनी त्यास त्याचे नाव व गाव विचारले असता त्याने आपले नाव अमन अभिमन अलोने,वय 23 वर्षे, रा.मातावार्ड ता.देसाईगंज,जि.गडचिरोली असे सांगितले.
यानंतर पोलीस पथकाने पंचासमक्ष सदर चारचाकी वाहनाची तपासणी केली असता, सदर चारचाकी वाहनामध्ये
1) 25 खरड्याच्या बॉक्समध्ये देशी दारु संत्री कंपनीच्या 90 एम.एल मापाच्या प्लास्टीकच्या प्रत्येकी 100 नग प्रमाणे 25 नग खरड्याच्या बॉक्समध्ये 2500 नग प्लास्टीक बॉटल किंमत अंदाजे 2,00,000/- रुपये व
2) अवैध दारुची वाहतूक करण्याकरीता वापरण्यात आलेली एक सिल्व्हर रंगाची मारुती सुझुकी कंपनीची रिट्झ व्हिएक्सआय चार वाहन क्रमांक.MH.20 BC 8161 किंमत अंदाजे 4,00,000/- रुपये असा एकूण 6,00,000/- रुपयांचा मुद्देमाल घटनास्थळावरुन जप्त करण्यात आलेला आहे.
सदर दारुच्या मुद्देमालाबाबत वाहन चालक याच्याकडे विचारपूस केली असता, त्याने सदर देशी-विदेशी दारुचा साठा हा आशिष नरेंद्र डाहाट, वय 37 वर्षे, रा. गांधीवार्ड, देसाईगंज,ता.देसाईगंज जि.गडचिरोली याचा असल्याचे सांगितले. संबंधीत घटनेच्या अनुषंगाने पोस्टे देसाईगंज येथे दिलेल्या तक्रारीवरुन अप क्र. 357/2026 कलम 65 (अ), 83, 98 (2) म.दा.का. अन्वये
आरोपी नामे : –
1) अमन अभिमन अलोने, वय 23 वर्षे रा.मातावार्ड, ता. देसाईगंज जि.गडचिरोली व
पाहिजे असलेला आरोपी
2) आशिष नरेंद्र डाहाट, वय 37 वर्षे, रा. गांधीवार्ड, देसाईगंज ता.देसाईगंज, जि.गडचिरोली यांच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर गुन्ह्राचा पुढील तपास सपोनि. संदिप आगरकर, पोस्टे देसाईगंज हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.कार्तिक मधीरा,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी., उपविभागीय पोलीस अधिकारी कुरखेडा श्री.रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे देसाईगंजचे प्रभारी अधिकारी पोनि.अजय जगताप यांच्या नेतृत्वात सपोनि.संदिप आगरकर,पोअं/नितेश कडव,विलास विधाते,मपोशि/सारमपल्लीवार, चापोहवा/राऊत यांनी पार पाडली.
error: Content is protected !!