Home Crime दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून 03 आरोपींकडून मोबाईल फोन...
दुकानाचे शटर तोडून चोरी करणाऱ्या आरोपीला अटक करून 03 आरोपींकडून मोबाईल फोन व इतर साहित्य करण्यात आले हस्तगत.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : दि.22/06/2026 गडचिरोली जिल्ह्रात वाढत्या चोरीच्या व घरफोडीच्या गुन्ह्रांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री.एम.रमेश यांनी कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना दिले आहेत.
त्याअनुषंगाने दि. 24 मे 2026 रोजी माऊली मोबाईल शॉप,रामनगर गडचिरोली जि. गडचिरोली येथील मोबाईल चोरी करणाया आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याची कारवाई पोस्टे गडचिरोली येथील अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की,गडचिरोली येथील रहिवासी श्री. अनिरुध्द दिकोंडवार रा.रामनगर वार्ड क्र.11 गडचिरोली जि.गडचिरोली हे दिनांक 24 मे 2026 रोजी रात्री 09.00 वा. त्यांचे माऊली मोबाईल शॉप, बंद करुन कुलूप लाऊन घरी गेले असता अज्ञात आरोपींनी रात्री त्यांच्या दुकानाचे कुलुप लोखंडी रॉडने तोडुन दुकानाच्या आत प्रवेश करून दुकानातील विविध कंपनीचे 09 मोबाईल हँडसेट अंदाजे किंमत 70,200/- रुपये, मोबाईल अॅक्सेसरीज अंदाजे किंमत 25,990/- रुपये व रोख रक्कम रु. 2,500/- असा एकूण 98,690/- रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता.
यावरुन दिनांक 26 मे 2026 रोजी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन, गडचिरोली येथे अप. क्र. 0657/2026 कलम 305 (ए), 331 (2) भान्यासं अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.सदर गुन्ह्यातील आरोपींनी घटनास्थळावर कोणतेही पुरावे न सोडल्याने आरोपींचा शोध घेणे हे पोलीसांपुढे आव्हान होते.
सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोस्टे गडचिरोली येथील पोलीस पथकाने तांत्रिक पुरावे व गोपनिय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपींचा अत्यंत शिताफिने शोध घेऊन आरोपी 1) रोहन व्यंकट दर्रो,वय 22 वर्षे रा. मुरमाडी ता.धानोरा जि.गडचिरोली व त्याच्या सोबत 02 विधी संघर्षग्रस्त बालके यांना ताब्यात घेतले होते.
सदर आरोपींकडे करण्यात आलेल्या सखोल चौकशी दरम्यान गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल चोरी केलेले 10 मोबाईल फोन अंदाजे किंमत 1,00,000/- रुपये व 01 आय फोन कंपनीचा मोबाईल किंमत 50,000/- रुपये असा एकूण 1,50,000/- रुपये किंमतीचे मोबाईल व ईतर साहित्य आरोपींकडून हस्तगत करण्यात आले आहे.
यातील आरोपी 1) रोहन व्यंकट दर्रो, वय 22 वर्षे रा. मुरमाडी ता.धानोरा जि. गडचिरोली याला अटक करण्यात आली असून 02 विधी संघर्षित बालकांना बाल न्यायमंडळापूढे हजर करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे. सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोउपनि.धनराज कोळी पोस्टे गडचिरोली हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री.कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन),श्री.गोकुल राज जी. सहाय्यक पोलीस अधीक्षक,गडचिरोली श्री. अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे गडचिरोलीचे प्रभारी अधिकारी पोनि.विनोद चव्हाण यांच्या नेतृत्वात पोउपनि.धनराज कोळी,पोउपनि. शिवाजी देशमुख, पोअं/गोविंद केकाण,पोअं/राजु कांबळे यांनी पार पाडली.
error: Content is protected !!