Friday, July 31, 2026
Home Chandrapur धान रोवनी व आवत्या पेरणीसाठी शेतकरी पावसासाठी आतुर.

धान रोवनी व आवत्या पेरणीसाठी शेतकरी पावसासाठी आतुर.

0
25

धान रोवनी व आवत्या पेरणीसाठी शेतकरी पावसासाठी आतुर.

सुकदर्शन वृतांत
ब्रह्मपुरी : (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) दिनांक,२२/०६/२६ नक्षत्र मृग संपला आद्रा लागल्या आकाशात काळेकुट्ट ढग, विजांचा लखलखाट मेघगर्जना सुरू परंतु पावसाच्या एका थेंबाचाही पत्ता नाही.पाण्या पावसाभावी काही शेतकऱ्यांचे धानाचे प-हे कडक उन्हामुळे बरोबर वापले नाही.काही शेतकऱ्यांचे रोवणी साठी तयार झालेले प-हे पाऊस न पडल्यामुळे वाळतात की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 
हजारो रुपयाची बिजाई घेऊन टाकलेले परे वाळले तर समोरील भविष्यातील जीवन कसे जगावे अशी भीती बळीराजाला पडली आहे.ब-याच शेतकऱ्यांनी अजूनही आवत्या धानाची पेरणी शेतात केलेली नाही, शेतीच्या हंगामाला सुरुवातच केली नाही.
 पावसामुळे शेतीचा हंगाम झाला नाही तर या महागाईच्या काळात काय खावे,कसे जगावे, मुला मुलींचे शिक्षण , सोय-या धाय-याच्या घरचे कार्यक्रम कसे करावे आणि पडणाऱ्या दुष्काळाला कसे तोंड द्यावे याचा विचार शेतकरी , मजूर वर्ग करीत आहे.
ह्यावर्षी पाऊसच पडला नाही किंवा पावसाचे प्रमाण कमी राहिले तर पिण्याच्या पाण्याची सुद्धा कमतरता भासून पाण्याविना पाळीव गुरे- ढोरे जंगली प्राणी, हजारो लाखोच्या संख्येने मानव मृत्युमुखी पडल्याशिवाय राहणार नाहीत अशी भीती शेतकरी व नागरिक बोलून दाखवित आहेत.
गावातील नागरिक पाऊस पडावा म्हणून देवाला वेगवेगळ्या प्रकारचे साकडे घालीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!