Friday, July 31, 2026
Home Crime सेवाग्राम आश्रमात तीन दिवसीय नशाबंदी मंडळाच्या संघटकाची संवाद ; समन्वय व वार्षिक...

सेवाग्राम आश्रमात तीन दिवसीय नशाबंदी मंडळाच्या संघटकाची संवाद ; समन्वय व वार्षिक नियोजन बैठक संपन्न. 📍नशाबंदी मंडळ गडचिरोली जिल्हा संघटक म्हणून संदीप कटकुरवार यांची नियुक्ती.

0
15

सेवाग्राम आश्रमात तीन दिवसीय नशाबंदी मंडळाच्या संघटकाची संवाद ; समन्वय व वार्षिक नियोजन बैठक संपन्न.

📍नशाबंदी मंडळ गडचिरोली जिल्हा संघटक म्हणून संदीप कटकुरवार यांची नियुक्ती.

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्रातील 36 जिल्हा संघटकाचे संवाद, समन्वय आणि वार्षिक नियोजन बैठकीचे आयोजन शुक्रवार 5 जून ते 7 जून पर्यंत यात्री निवास सेवाग्राम आश्रम जिल्हा वर्धा या ठिकाणी आयोजित करण्यात आले.या ठिकाणी संघटना सन-2026-27 ची मान्यता तसेच वर्ष भरात संघटकांच्या कार्याचे नियोजन करण्यात आले.
संघटकांना साहित्य पोस्टर,पत्रक महामानवाचे व्यसनमुक्ती विचारांचे पुस्तक, व्यसनमुक्ती वरील सापशिडी सिडी देण्यात आली. या वेळी संघटक बैठकीचे उद्घाटन कल्याण यात्रा व वार्षिक कार्य अहवालाचे प्रकाशन नशाबंदी मंडळाचे अध्यक्ष माजी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास, चिटणीस/मुख्य संघटक अमोल मडामे, चिटणीस चंद्रकांत चौधरी, सदस्य बाॅस्को डिसूझा, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष वर्धा चे डाॅ.नितिका व त्याची टीम हे उपस्थित होते.यावेळी किती जिल्ह्यातील संघटक 6 विभाग प्रमुख, नशाबंदी मंडळाचे कार्यालय कर्मचारी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉक्टर राजन वेळूकर यांनी संस्था चालवताना कशा पद्धतीने फंड गोळा केला पाहिजे त्यासाठी संस्थेचे प्रेझेंटेशन कसे असावे यावर मार्गदर्शन केले. तसेच नशाबंदी मंडळाच्या जिल्हा संघटक यांचे कौतुक केले. त्यांना सूर्याची उपमा दिली मंडळाला पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
सदर कार्यक्रमाची प्रस्तावना नशाबंदी मंडळाचे मुख्य संघटक व चिटणीस अमोल स.भा.मडामे यांनी केले. वर्षभरात आपल्या जिल्ह्यात विशेष कार्य केल्याबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबईकर यांना गोल्डन मेडल देऊन तर नागपूर जिल्हा संघटक गौरव यांना सिल्वर मेडल तर पालघर जिल्हा संघटक मिलिंद पाटील यांना ब्रान्स मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी विभागीय संघटक प्रमुख म्हणून उत्तम काम केल्याबद्दल प्रथम क्रमांक पुणे विभाग प्रमुख ऍड. सुरेश संकटे व त्याची टीम यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम तीन हजार रुपये तर दुसरा क्रमांक कोकण विभाग प्रमुख दिशा कळबे व त्याची टीम यांना सन्मानचिन्ह व रोख रक्कम दोन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ. राजन वेळूकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
त्या नंतर नशाबंदी मंडळाचे 36 संघटकांनी आपला परिचय देऊन विभाग प्रमुखांची निवड करण्यात आले. तसेच अहवाल लेखन, ऑनलाईन, बैठकी विषयी सूचना तसेच कल्याण यात्रा पत्रिका विषयी सूचना मुख्य संघटक यांनी दिल्या. संघटकांना व्यसनमुक्तीची किती माहिती आहे ? हे जाणून घेण्यासाठी बोलबच्चन हा खेळ सरचिटणीस त्यांनी घेतला. 
दुसऱ्या दिवशी 6 जून रोजी रॅली काढणे दिवसाची सुरुवात झाली. त्यानंतर 36 जिल्हा संघटकांनी आपल्या जिल्ह्यातील ऐतिहासिक ओळख व्यसनमुक्ती केंद्र शाळा महाविद्यालय आश्रम शाळा वस्तीगृह किती आहेत सांगून जिल्ह्याचा परिचय देण्यात सांगण्यात आले तसेच विभाग नुसार बसून जिल्हा संघटक यांचे वार्षिक कार्यक्रम नियोजन करण्यात आले.
त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात किमान तीन शाळा व तीन महाविद्यालय तंबाखूमुक्त करण्याचा व प्रत्येक जिल्ह्यात ड्रग्स फ्री जिल्हा अभियान राबवून नशा मुक्त भारत अभियानास अधिक ब देण्याचा संकल्प करण्यात आला. संध्याकाळी सेवाग्राम आश्रम भेट व सर्वधर्म प्रार्थना मध्ये सहभाग घेतला.
रात्री संघटक यांनी पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. तिसऱ्या दिवशी म्हणजे 7 जून रोजी सकाळी नशाबंदी मंडळाचे कार्यकारी सदस्य बास्को डिसूजा यांनी नवीन अंमली पदार्थाची ओळख या विषयावर मार्गदर्शन केले.
तर नशाबंदी मंडळाच्या कार्यकारी सदस्य सुजाता सावंत यांनी जिल्ह्यात फंड कशा प्रकारे उभा कराता येईल यावर मार्गदर्शन केले. बैठक समारोप प्रसंगी जिल्हा परिषद वर्ध्याचे जिल्हा समाज कल्याण विभागाचे निरीक्षक मा.राज मरापे यांनी भेट देऊन संगणकाचे कौतुक केले व सदिच्छा दिल्या. त्यांच्या हस्ते प्रत्येक संघटकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन शिबिराचा समारोप झाला.
या तीन दिवशीय बैठकीत गडचिरोली जिल्हा संघटक म्हणून संदीप कटकुरवार यांची नियुक्ती करण्यात आली.याप्रसंगी संदीप कटकुरवार यांनी जिल्ह्यात व्यसनमुक्तीचे कार्य अधिक जोमात होण्याकरता स्वतः प्रयत्नशील राहुल तसेच प्रशासनाची मदत घेऊन जनसामान्याना सहभागी करून घेऊन व्यसनमुक्त गडचिरोली जिल्हा निर्माण करण्याचा संकल्प केला. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!