Home Chandrapur अ-हेरनवरगांव येथे संयुक्त मालकी हक्क मोहीम कार्यक्रम संपन्न. 📍खेड्यातील रान भाजीचा गंध...
अ-हेरनवरगांव येथे संयुक्त मालकी हक्क मोहीम कार्यक्रम संपन्न.
📍खेड्यातील रान भाजीचा गंध शहरी भागात दरवळतो – वामनभाऊ मिसार
सुकदर्शन वृतांत
ब्रम्हपुरी – ०८/०९/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक)
महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत आदर्श लोकसंचालित साधन केंद्र, ब्रम्हपुरी – नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्दम विकास प्रकल्प अंतर्गत संयुक्त मालकी हक्क मोहीम कार्यक्रम ब्रम्हपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगांव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या पटांगणात घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुका कृषी सल्लागार तथा माजी उपसरपंच वामनरावजी मिसार यांनी अ-हेरनवरगांव येथील वीस बचत गट महिलांच्या उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आदर्श लोकसंचालित साधन केंद्र ब्रम्हपुरी च्या व्यवस्थापिका विद्या लोखंडे, वैशाली ढोरे अंगणवाडी कार्यकर्ती,नयना क-हाडे आशा वर्कर,अमरदीप लोखंडे,राहुल कोल्हे विचार पिठावर उपस्थित होते.
विद्या लोखंडे यांनी महिलांना संयुक्त मालकी हक्क मोहीम राबविण्यासाठी लक्ष्मी मुक्ती योजनेबद्दल तसेच शासनाच्या महिलांसाठी असलेल्या अनेक योजनांचा लाभ बचत गटाच्या माध्यमातून घेण्याचे आवाहन केले.
रानभाज्यांचा खरा उगम हा ग्रामीण भागातील शेत व जंगलव्याप्त जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतो.आणि त्यामुळे रानभाज्या महोत्सव जेव्हा शहरी भागात घेतल्या जातो तेव्हा शहरी भागातील नागरिक रानभाज्या व त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ मोठ्या आवडीने विकत घेऊन त्याची चव घेत असतात.
असे मनोगत वामनरावजी मिसार यांनी उपस्थित बचत गटातील व गावातील उपस्थित महिलांसमोर व्यक्त केले आणि निरोगी राहण्यासाठी जास्तीत जास्त रानभाज्यांचा आपल्या आहारात वापर करावा असेहीआवाहन त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहुल कोल्हे व प्रेरीका लता कोल्हे यांनी गावातील बचत गटाच्या सहकार्याने अथक परिश्रम करून यशस्वीरित्या पार पाडला.कार्यक्रमाचे संचालन व आभार दुरोत्तमा घोडेस्वार यांनी केले.
error: Content is protected !!