Home Gadchiroli सिरोंचा – अहेरी मार्गावर रंगयापल्ली – वढण जवळ अपघात 10 प्रवाशांपैकी 3...
सिरोंचा – अहेरी मार्गावर रंगयापल्ली – वढण जवळ अपघात 10 प्रवाशांपैकी 3 गंभीर जखमी
सुकदर्शन वृतांत
सिरोंचा : सिरोंचा – अहेरी मार्गावर रंगयापल्ली – वढण येथे मंगळवारी सिरोंचाहून अहेरीकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसची आणि जाफराबाद येथील काळी-पिवळी प्रवासी वाहनाची समोरासमोर धडक होऊन अपघाताची घटना घडली.या अपघातात काळी-पिवळी वाहनातील सुमारे 10 प्रवासी जखमी झाल्याची माहिती असून, त्यापैकी तीन प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर जखमींना तातडीने सिरोंचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले.गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी तेलंगणा राज्यातील रुग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती आहे. अपघातामुळे काही काळ सिरोंचा-अहेरी मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला.घटनेची माहिती मिळताच सिरोंचा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.सिरोंचा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस महिला उपनिरीक्षक शिंदे मॅडम, आणि पोलीस अंमलदार पिल्लीवार,सातपुते यांनी पुढील तपास करीत आहेत.
error: Content is protected !!