Monday, September 14, 2026
Home Chandrapur मूल नगर परिषदेत कंत्राटी सफाई कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन न्याय्य व वैधानिक...

मूल नगर परिषदेत कंत्राटी सफाई कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन न्याय्य व वैधानिक मागण्यांसाठी INTUC आक्रमक ; ३ सप्टेंबर पासून आंदोलनाला सुरुवात

मूल नगर परिषदेत कंत्राटी सफाई कामगारांचे बेमुदत धरणे आंदोलन

न्याय्य व वैधानिक मागण्यांसाठी INTUC आक्रमक ; ३ सप्टेंबर पासून आंदोलनाला सुरुवात

सुकदर्शन वृतांत 
मूल : (राजेंद्र वाढई – उपसंपादक) नगर परिषद मूल अंतर्गत कार्यरत कंत्राटी सफाई कामगारांच्या न्याय्य व वैधानिक मागण्यांकडे कंत्राटदार व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत INTUCच्या नेतृत्वाखाली कंत्राटी सफाई कामगारांनी गुरुवार,३ सप्टेंबर पासून नगर परिषद कार्यालयासमोर शांततामय धरणे व निदर्शने आंदोलन सुरू केले आहे.
नगर परिषद मूल अंतर्गत Urban Enviro Waste Limited,नागपूर या कंत्राटदारामार्फत सफाई कामगार कार्यरत आहेत.कामगारांच्या वेतन,पीएफ,उपस्थिती,कामाची नोंद तसेच इतर वैधानिक बाबींशी संबंधित मागण्यांबाबत यापूर्वी निवेदने देऊनही समाधानकारक तोडगा निघाला नसल्याचे INTUCने म्हटले आहे.
कंत्राटी सफाई कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता पात्र कामगारांना कामावर घेणे, शासनाने निश्चित केलेल्या किमान वेतन कायद्यानुसार वेतन देणे, कमी दिलेल्या वेतनाची थकबाकी अदा करणे, सर्व पात्र कामगारांना पीएफ व इतर वैधानिक लाभ देणे,उपस्थिती व वेतनाची योग्य नोंद ठेवणे, तसेच कामगारांवर अन्यायकारक कारवाई
error: Content is protected !!