Monday, September 14, 2026
Home Education गडचिरोली आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे मानव विकास बसेस बंद अवस्थेत ; विद्यार्थी –...

गडचिरोली आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे मानव विकास बसेस बंद अवस्थेत ; विद्यार्थी – विद्यार्थिनींना फटका.

गडचिरोली आगार व्यवस्थापकांच्या दुर्लक्षामुळे मानव विकास बसेस बंद अवस्थेत ; विद्यार्थी – विद्यार्थिनींना फटका.

सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : शहरातील बस स्थानकात बसेसची कमतरता असण्याचे नेमके कारण बस आगरातील पाहणी दरम्यान उघडकीस आलेले आहे. व बस आगारामध्ये पाहणी केली असता वर्कशॉप परिसरात गडचिरोली आगारातील “ मानव विकास ” अंतर्गत चालणाऱ्या अनेक बसा ना दुरुस्त अवस्थेत आढळून आल्या.
सदर बसांचे चाक व टायर खोलून तात्काळ दुरुस्त न करता बसांच्या काढलेल्या डिस्कवर ठेवून असलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत.सदर मानव विकास अंतर्गत चालणाऱ्या बसांची अशाप्रकारे गैरसोय होत असण्याचे नेमके कारण म्हणजे आगारातील कामकाजाकडे आगार व्यवस्थापकांकडून सर्रास दुर्लक्ष होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे अशा प्रकारे ना दुरुस्त असलेल्या “ मानव विकास ” एस टी बसांच्या कमतरतेमुळे शाळेकरी विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा कॉलेजला ये-जा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.तसेच शहरातील बसणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसांच्या अभावामुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या प्रकारावरुन अशाप्रकारे शासनाकडून “ मानव विकास ” एस.टी.बस आगारांमध्ये दिल्यात खर्‍या परंतु त्यांचा निधी आगारांमध्ये दिला जातो का नाही.आणि जर निधी दिला जात असेल,तर अशाप्रकारे मानव विकास च्या बस नादुरुस्त अवस्थेत कशा काय ठेवल्या जातात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सदर आगारात भेट दिली असता आगारातील वर्क शॉप परीसरात अनेक बसांचे चाक काढून डिस्क वरती ठेवलेल्या अवस्थेत आढळून आल्या असता आगार व्यवस्थापकांना भेटण्यासाठी गेले असता व्यवस्थापक कार्यालयात उपस्थित नसल्यामुळे त्या नं च्याशी दुरध्वनी द्वारे संपर्क साधन्याचा प्रयत्न केला असता कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
त्यामुळे अशाप्रकारे मानव विकास अंतर्गत चालणाऱ्या बसांच्या देखभालीकडे दुर्लक्ष करणे म्हणजेच शासनाकडून “मानव विकास” निधीमध्ये कपात केली जात आहे, की काय असे वक्तव्य प्रवाशांमध्ये व्यक्त केले जात आहे.
error: Content is protected !!