Sunday, September 13, 2026
Home Chandrapur होमराज राऊत यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून फेरनिवड

होमराज राऊत यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून फेरनिवड

होमराज राऊत यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून फेरनिवड

सुकदर्शन वृतांत 
ब्रम्हपुरी : दि,१८/०८/२६ (अमरदीप लोखंडे –  सहसंपादक) आज पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत अधिकारी किशोर अढाव यांनी प्रशासक दामिनी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व जितेंद्र क-हाडे उपसरपंच, श्रीकांत पिलारे , चंद्रकांत गाताडे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा घेतली. 
ग्रामसभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे,बोरवेल असलेल्या मोहल्यात गढूळ पाणी येणे , गावातील नाल्या न उपसणे, इ- रिक्षा खरेदी करणे, घरकुल यादी मंजूर व नामंजूर झालेल्यांची नावे वाचून दाखविणे, माझी वसुंधरा योजनेअंतर्गत कार्य करणे, गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला असता रोगप्रतिबंधक फवारणी करणे, वार्ड नंबर एक मधील नळ धारकांना पिण्याचे पाणी मिळत नाही यावर उपाययोजना करणे, सूर्यघर सौर ऊर्जा यावर चर्चा व इतर गावातील विकासात्मक आराखड्यावरती चर्चा करून आजची ग्रामसभा शांततेत पार पाडली.
आजच्या ग्रामसभेत तंटामुक्ती कार्यकारिणीची फेर रचना करण्याचा विषय चर्चेला घेतला असता होमराज राऊत यांची तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून फेरनिवड करण्यात यावी असे ग्रामसभेत सर्वानुमते ठरविण्यात आले असता त्यांची फेर निवड करण्यात आली. 
होमराज राऊत यांनी केलेल्या मागील वर्षाच्या कार्याची जनमानसाच्या हृदयात बसवून ठेवलेल्या काम करण्याची शैली हे मुख्य फेरनिवडीचे कारण आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल वामनरावजी मिसार, अमरदीप लोखंडे,डाकराम ठेंगरे पाटील, जागेश्वर चौधरी, नवलाजी सोंदरकर, राहुल कोल्हे, खुशाल टेंभुरकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. गावातील मित्रपरिवार व ग्रामवासी यांनी आनंद व्यक्त करून पुढील वाटचालीस त्यांना भरभरून शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!