Monday, September 14, 2026
Home Chandrapur व्याहाड (खुर्द) – जांब (बुज) रस्ता अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झाली चाळण प्रशासनाचे...

व्याहाड (खुर्द) – जांब (बुज) रस्ता अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झाली चाळण प्रशासनाचे दुर्लक्ष ; विद्यार्थी,नागरिकांचा जीवघेणा प्रवास

व्याहाड (खुर्द) – जांब (बुज) रस्ता अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची झाली चाळण

प्रशासनाचे दुर्लक्ष ; विद्यार्थी,नागरिकांचा जीवघेणा प्रवास

सुकदर्शन वृतांत 
सावली : व्याहाड (खुर्द) ते जांब (बुज) या अंतर्गत रस्त्यावर वाढलेल्या अवजड वाहतुकीमुळे रस्त्याची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. पावसामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याच खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यावरून शाळकरी विद्यार्थी तसेच नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
व्याहाड (खुर्द) ते जांब (बुज) हा मार्ग परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावरून साखरी, लोंढोली, मार्कंडा देवस्थान तसेच चामोर्शी येथे नागरिकांची ये-जा असते. त्याचप्रमाणे जांब (बुज) जांब रईतवारी, गव्हार्ला, कोंडेखल आणि केरोडा परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी, नागरिक बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी, शेतकरी शेतीच्या कामासाठी, तर अनेक जण मोलमजुरी तसेच आरोग्य उपचारासाठी व्याहाड खुर्द येथे ये-जा करतात.
त्यामुळे या मार्गावर दररोज हजारो नागरिकांची वर्दळ असते. मात्र, पावसामुळे या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. संपूर्ण रस्ता खड्यांनी व्यापला असून ठिकठिकाणी चिखल साचला आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणे विद्यार्थी आणि नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे.
या रस्त्याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा तक्रारी करूनही प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जात नसल्याचा आरोप आहे. त्यामुळे ” हा जीवघेणा प्रवास आणखी किती दिवस करायचा ? ” असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून तयार करण्यात आला होता.
error: Content is protected !!