Home Gadchiroli राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती समता संघर्ष समाज परिवर्तन...
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने उत्साहात साजरी.
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिनांक २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता गोकुळ नगर, गडचिरोली येथे आरक्षणाचे आद्य जनक,सामाजिक न्यायाचे प्रणेते, शिक्षणप्रेमी, लोककल्याणकारी राज्यकर्ते आणि बहुजन समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्य समर्पित करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची १५२ वी जयंती अत्यंत उत्साहपूर्ण, प्रेरणादायी आणि अभिमानास्पद वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादनाने करण्यात आली.त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी शाहू महाराज यांच्या जीवनकार्याचा गौरवपूर्ण आढावा घेत सामाजिक न्याय, समता, शिक्षणाचा प्रसार, मागासवर्गीयांसाठी आरक्षण, स्त्री – पुरुष समानता आणि सर्वसमावेशक विकासासाठी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक योगदानाचे स्मरण केले.
त्यांच्या विचारांचा वारसा जपत सामाजिक परिवर्तनासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या कार्यक्रमास आयु. मायाताई लक्ष्मण मोहुर्ले (प्रदेश अध्यक्षा),समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य आयु. विजय देवतळे (प्रदेश उपाध्यक्ष), समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य
आयु.किशोर नरूले (प्रदेश सचिव), समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना महाराष्ट्र राज्य आयु.लक्ष्मण मोहुर्ले (सामाजिक कार्यकर्ते, गडचिरोली) आयु.महेश काळबांधे, आयु.सुनील मोहुर्ले जिल्हाध्यक्ष समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना गडचिरोली,आयु.किशोर देवतळे जिल्हा उपाध्यक्ष समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना गडचिरोली
आयु.योगेश गोरडवार जिल्हा सचिव समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना गडचिरोली आयु. सुधीर मुंघांटे साहेब, आयु. नंदेश्वर कथले साहेब आयु.राकेश पौरकर साहेब माझी जिल्हाध्यक्ष समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना गडचिरोली आयु शुभम मोहुर्ले इंजिनिअर,सिध्दार्थ मोहुर्ले तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिनी,युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी समता संघर्ष समाज परिवर्तन संघटनेच्या वतीने राजर्षी शाहू महाराज यांच्या समतावादी, लोकहितवादी आणि परिवर्तनवादी विचारांचा समाजात अधिक व्यापक प्रसार करण्याचा तसेच शिक्षण, बंधुता, समानता, संविधानिक मूल्ये आणि सामाजिक न्याय यांची जोपासना करण्यासाठी सातत्याने कार्यरत राहण्याचा दृढ संकल्प करण्यात आला.
” राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला सामाजिक न्यायाचा आणि आरक्षणाचा विचार हा आजही समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या समतेच्या,शिक्षणाच्या आणि मानवतेच्या तत्त्वांचा स्वीकार करूनच न्याय्य, समतामूलक, सुशिक्षित आणि प्रगत समाजाची निर्मिती शक्य आहे.” – समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्य
error: Content is protected !!