Monday, September 14, 2026
Home Chandrapur सावली तालुक्यातील किसाननगर येथे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात निषेध करून चिखलमय रस्त्यावरच नागरिकांची ”...

सावली तालुक्यातील किसाननगर येथे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात निषेध करून चिखलमय रस्त्यावरच नागरिकांची ” रोवणी ” ;  रस्ता बांधकामाची नागरिकांची मागणी

सावली तालुक्यातील किसाननगर येथे प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात निषेध करून चिखलमय रस्त्यावरच नागरिकांची ” रोवणी ” ;  रस्ता बांधकामाची नागरिकांची मागणी

सुकदर्शन वृतांत 
सावली  : दिनांक,26 ऑगस्ट 2026 सावली पंचायत समिती अंतर्गत व्याहाड (खुर्द) ग्रामपंचायतीच्या किसान नगर परिसरातील जिल्हा परिषद शाळा ते सोमी गलगट या सुमारे ५०० मीटर रस्त्याची पावसामुळे अक्षरशः चिखलवाट झाली आहे.
रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचल्याने नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या रस्त्याचे बांधकाम करण्यात यावे,अशी मागणी ग्रामस्थांकडून अनेक दिवसांपासून संबंधित विभागाकडे करण्यात येत आहे.
वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट होत असून शाळकरी मुले, महिला, वृद्ध आणि दुचाकीस्वारांना या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे.
रस्त्यावर चिखल व पाणी साचल्यामुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संतप्त नागरिकांनी चक्क चिखलमय रस्त्यावरच रोवणी करून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला.
रस्त्याची दुरवस्था आणि प्रशासनाचे दुर्लक्ष याकडे लक्ष वेधण्यासाठी करण्यात आलेल्या या अनोख्या आंदोलनाची परिसरात चर्चा होत आहे.किसान नगरातील नागरिकांना वर्षानुवर्षे चिखलातून वाट काढावी लागू नये,यासाठी संबंधित विभागाने तातडीने पाहणी करून या ५०० मीटर रस्त्याचे कायमस्वरूपी बांधकाम करावे,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
error: Content is protected !!