Home Chandrapur प्रा.दलेश परशुरामकर यांना भौतिकशास्त्रात आचार्य (Ph.D) पदवी.
प्रा.दलेश परशुरामकर यांना भौतिकशास्त्रात आचार्य (Ph.D) पदवी.
सुकदर्शन वृतांत
ब्रह्मपुरी – २४/०७/२६ (अमरदीप लोखंडे – सहसंपादक) येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागातील प्रा दलेश परशुरामकर यांनी नुकतीच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील आचार्य पदवी प्राप्त केली.त्यांनी आपला डेव्हलपमेंट ऑफ सम लॅथेनाईडस ऍक्टिवेटेड इनऑरगॅनिक फॉस्फर्स फॉर इनव्हरोमेंट फ्रेंडली सॉलिड स्टेट लाइटीनिंग अँपलीकेशन ” या विषयाचा प्रबंध मार्गदर्शक डॉ.अतुल येरपुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाला सादर केला होता.
आचार्य पदवी मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्रीमती स्नेहलताबाई भैया,उपाध्यक्ष अँड प्रकाश भैया, सचिव अशोक भैया, प्राचार्य डॉ.सुभाष शेकोकर,माजी प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणे,डॉ राजेंद्र डांगे,डॉ धनराज खानोरकर,डॉ अरविंद मुंगोले,डॉ मोहन कापगते, डॉ अभिमन्यू पवार ,समस्त प्राध्यापक वृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी व मित्रमंडळींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
error: Content is protected !!