Monday, September 14, 2026
Home Gadchiroli नवेगाव (मुरखळा) शासकीय योजना व तक्रार निवारण शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

नवेगाव (मुरखळा) शासकीय योजना व तक्रार निवारण शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

नवेगाव (मुरखळा) शासकीय योजना व तक्रार निवारण शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

सुकदर्शन वृतांत 
नवेगाव (मुरखळा) : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ सहज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने वीर बाबुराव शेडमाके अभ्यासिका,नवेगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या शासकीय योजना अंमलबजावणी व तक्रार निवारण विशेष शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक,युवक व विविध घटकांतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये आयुष्मान भारत कार्ड नोंदणी, ABHA हेल्थ कार्ड निर्मिती,पदवीधर मतदार नोंदणी,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तक्रार निवारण, संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेशी संबंधित अर्ज व तक्रारींचे निवारण करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शनासह तत्काळ सेवा उपलब्ध करून देण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे आणि नागरिकांच्या विविध अडचणींचे त्वरित निराकरण करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या माध्यमातून अनेक नागरिकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लागण्यास मदत झाली.
या लोकहितवादी उपक्रमाचे यशस्वी आयोजन सामाजिक कार्यकर्त्या राणी गोपशेटवार व भूषणा खेडेकर यांनी केले.त्यांच्या पुढाकारामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाला. उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे कौतुक करत भविष्यातही अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात यावे,
अशी अपेक्षा व्यक्त केली.ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या कल्याणकारी योजनांशी जोडणारा हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला असून शिबिरामुळे अनेक कुटुंबांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
error: Content is protected !!