वीज कोसळून एका महिला 20 शेळ्या आणि एका म्हशीचा जागीच मृत्यू.
सुकदर्शन वृतांत
भंडारा : तुमसर तालुक्यात दि,22 जून 2026 सोमवार रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटामुळे मोठी जीवित व वित्तहानी झाली.तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळल्याच्या घटनांमध्ये एका महिला शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.तर 20 शेळ्या आणि एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकरी व पशुपालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,सायंकाळी अचानक हवामानात बदल होऊन जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट सुरू असतानाच वीज कोसळण्याच्या घटना घडल्या. शेतातील कामे आटोपत असताना एका महिला शेतकऱ्याच्या अंगावर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
तालुक्यातील दुसऱ्या घटनेत वीज कोसळल्याने एका पशुपालकाच्या 20 शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला.तसेच आणखी एका ठिकाणी एका म्हशीचाही वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अचानक घडलेल्या या घटनांमुळे संबंधित कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घटनांची माहिती मिळताच महसूल व स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली.
नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाच्या नियमानुसार तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकरी संघटनांनी केली आहे.पावसाळ्याच्या सुरुवातीलाच निसर्गाच्या या तडाख्यामुळे तुमसर तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी वादळी पाऊस व विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
error: Content is protected !!