Friday, July 31, 2026
Home Chandrapur कवी : – अमरदीप प्रल्हाद लोखंडे यांच्या  लेखणीतून…   सगळे फुटले…!

कवी : – अमरदीप प्रल्हाद लोखंडे यांच्या  लेखणीतून…   सगळे फुटले…!

0
17

सगळे फुटले…!

  सुकदर्शन वृतांत                                              दि.२१/०६/२६
नशीब फुटले, पेपर फुटला
आमदार फुटले खासदार
 कोण वाचले कोण मेले
कोण ठरला वारसदार…१
बारा वर्षाची तपश्चर्या करून 
प्रजेला नाही मिळत सुख
गल्लीपासून दिल्लीपर्यंत 
एकच बोंब दु:ख ही दु:ख…२
भरजरी पोशाख दिमाखदार 
छंद राजाला बहुरंगी टोपीचा 
कोण जेवला कोण उपाशी 
ताटात पत्ता नाही रोटीचा…३
याले फोळा त्याले झोळा
मोठे मोठे डोळे काढून 
जर का मानले नाही 
करती लुले तंगडे तोडून..४
नीती, अनीती कुटनीती
आव्याकाच्या बाहेर गेली 
ओठात एक पोटात दुसरे 
कांक्रोच पार्टी जन्मास आली..५
जातीसाठी लढा सुरू 
जागी जनता रस्त्यावर 
ओबीसीचा भरा रखाना 
विश्वास ठेवून जनगणनेवर..६
रक्षण करते भक्षक झाले 
घरात शिरली दानपेटी 
दान करते भक्त बिचारे
नवस फेडती पुत्र ,सुखासाठी…७ 
आग ओकते मोठी सूर्य 
अधिक मास महिना धोंड्या 
अजून दाना जमिनीत नाही 
विचारात माझा शेतकरी पांड्या..८
रोज आभाळाकड नजर त्याची 
काळ्याकुट्ट ढगाकडे
येरे येरे पावसा म्हणत
भगवंताच्या पाया पडे…९
देव धावत पावत नाही 
तोच लूला पांगळा झाला 
पापी वासनेचे मानवचक्र
अल निनो मधात आला…१०
लालसेने कळस गाठला 
जनते पेक्षा मित्र भारी 
चुंबकीय त्या खुर्चीसाठी
फोडून फुटले बोलणी सुरू..११
————————————–
कवी : – अमरदीप प्रल्हाद लोखंडे                    मु.पो.अ-हेरनवरगांव ता.ब्रह्मपुरी जि.चंद्रपुर – ४४१२०६
८३०८००५८६८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!