Home Gadchiroli समाजनिष्ठ कार्यकर्ते आयु.लक्ष्मण मोहुर्ले साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा 📍सामाजिक बांधिलकी,संविधानिक विचार व...
समाजनिष्ठ कार्यकर्ते आयु.लक्ष्मण मोहुर्ले साहेबांचा वाढदिवस उत्साहात साजरा
📍सामाजिक बांधिलकी,संविधानिक विचार व समाज परिवर्तनाचा संदेश
सुकदर्शन वृतांत
गडचिरोली : समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्यचे मा. मुख्य मार्गदर्शक तथा शासकीय सेवेत कार्यरत असलेले समाजनिष्ठ कार्यकर्ते आयु. लक्ष्मण मोहुर्ले साहेब यांचा वाढदिवस दिनांक,१५ सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली येथील विश्रामगृह गांधी चौक परिसरात सामाजिक बांधिलकी, विचारांची प्रेरणा आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित समाजबांधव, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आयु.लक्ष्मण मोहुर्ले साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी दीर्घायुष्याची, उत्तम आरोग्याची व अखंड समाजसेवेची सदिच्छा व्यक्त केली.
शासकीय सेवेसोबत समाजकार्याचा आदर्श : –
आयु.लक्ष्मण मोहुर्ले साहेब हे शासकीय सेवेत कार्यरत असतानाही समाजाच्या प्रश्नांशी नाळ जोडून ठेवणारे आणि तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणारे समाजनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. नोकरीच्या व्यापातून वेळ काढून समाजासाठी कार्य करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे तसेच समाजबांधवांच्या अडचणींमध्ये मदतीला धावून जाणे, ही त्यांच्या कार्याची वैशिष्ट्ये आहेत.
आज अनेक कर्मचारी बांधव नोकरीच्या व्यापामुळे समाजकार्यापासून दूर राहतात किंवा निवृत्तीनंतर समाजासाठी काम करण्याचा विचार करतात. मात्र, मोहुर्ले साहेबांनी आपल्या कार्यातून समाजाप्रती असलेली तळमळ आणि बांधिलकी जपली आहे. शासकीय जबाबदाऱ्या पार पाडतानाच सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ देण्याचा त्यांचा आदर्श समाजातील युवा व कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
समाज परिवर्तनाच्या चळवळीला बळ देण्याचा संकल्प : –
आयु.लक्ष्मण मोहुर्ले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक एकता,शिक्षण, संविधानिक विचार, समता आणि बंधुता रुजविण्यासाठी कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित समाज परिवर्तनाची चळवळ अधिक मजबूत करण्यासाठी सर्व समाजबांधवांनी एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी आयु. लक्ष्मण मोहुर्ले साहेब यांच्या सामाजिक कार्याला मनःपूर्वक नमन करून त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि समाजसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभो, अशा शुभेच्छा उपस्थितांनी दिल्या.
पदाधिकारी व समाजबांधवांची उपस्थिती : –
या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला समता संघर्ष समाज परिवर्तन संघटना, महाराष्ट्र राज्यचे प्रदेश उपाध्यक्ष मान. विजय देवतळे,प्रा.विकास गोरडवार सर प्रदेश सहसचिव संदीप येनगंटीवार,शहर प्रमुख योगेश गोरडवार,सुकदर्शन वृतांत चे संपादक सुरेश कन्नमवार
संतोष मुनघाटे,सुधीर मुनघाटे, संतोष देवतळे, कुंदन घोगरे,गौरव सोनुले,विपूल सेगम,शंकर मोहुर्ले, रोशन गुरनुले, ओम सुदाम, मारोती कोकोडे,अविनाश कोकोडे तसेच इतर समाजबांधव व कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!