Home Chandrapur प्रा.योगपती गुलाब बारसागडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
प्रा.योगपती गुलाब बारसागडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
सुकदर्शन वृतांत
चंद्रपूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कार्य केल्याबद्दल प्रा.योगपती गुलाब बारसागडे यांना प्रतिष्ठेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. माननीय आमदार श्री. सुधाकरजी अडबाले तसेच पदवीधर मतदारसंघाचे आमदार श्री.वंजारी साहेब यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, गोविंद महिना फाउंडेशन आणि गोविंदराव वंजारी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
प्रा.बारसागडे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रा बरसागडे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर येथे कार्यरत आहेत.विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी नमूद केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. योगपती गुलाब बारसागडे यांनी पुरस्कार प्रदान करणाऱ्या मान्यवरांचे तसेच आयोजक संस्थांचे आभार मानले. तसेच या सन्मानाबद्दल शुभेच्छा व आशीर्वाद देणाऱ्या सर्व शिक्षक,सहकारी, मित्रपरिवार आणि हितचिंतकांचे त्यांनी मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
हा पुरस्कार पुढील काळात शिक्षण क्षेत्रात अधिक समर्पणाने कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना प्रा. बारसागडे यांनी व्यक्त केली.
error: Content is protected !!