Saturday, September 12, 2026
Home Chandrapur सावली तालुक्यात सोलर पॅनल बसवून देण्याच्या नावाखाली सरपंचाची फसवणूक ? इंडो सोलर...

सावली तालुक्यात सोलर पॅनल बसवून देण्याच्या नावाखाली सरपंचाची फसवणूक ? इंडो सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या नावाने पैसे घेतल्याचा आरोप ; सावली पोलिसांत तक्रार

सावली तालुक्यात सोलर पॅनल बसवून देण्याच्या नावाखाली सरपंचाची फसवणूक ?

इंडो सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी च्या नावाने पैसे घेतल्याचा आरोप ; सावली पोलिसांत तक्रार

सुरेश कन्नमवारमुख्य संपादक                               सुकदर्शन वृतांत
सावली : ग्रामपंचायतीच्या सरपंचांच्या घरी सोलर पॅनल बसवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतल्यानंतर संबंधित व्यक्ती संपर्काबाहेर गेल्याचा प्रकार व्याहाड (बुज) येथे समोर आला आहे.याप्रकरणी व्याहाड (बुज) ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.कविता रवींद्र बोलीवार यांनी सावली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर करून चौकशी व कारवाईची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार,दि.25/08/2026 रोजी तीन व्यक्ती सरपंच सौ.कविता बोलीवार यांच्या घरी आले.त्यांनी आपण इंडो सोलर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी कडून आल्याचे सांगितले. सरपंचांच्या घरी प्रथम सोलर पॅनल बसवून त्याचा गावातील नागरिकांना डेमो दाखविण्यात येईल तसेच त्यानंतर कंपनीची जाहिरात गावात करण्यास सांगण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
यासाठी कंपनीला 31,200/- रुपये भरावयास सांगण्यात आले.संबंधित रक्कम भरल्यानंतर इन्वर्टर,बॅटरी व सोलर पॅनलच्या दोन प्लेट त्यांच्या घरी आणून देण्यात आल्या. तसेच दोन इंजिनिअर येऊन सोलरची फिटिंग करतील, असे सांगण्यात आले.फिटिंगसाठी दिनांक,29 ऑगस्ट 2026 ही तारीख देण्यात आली होती.
दरम्यान, सोलर पॅनलचा गावातील नागरिकांना डेमो दाखविल्यानंतर प्रत्येक डेमोसाठी 10,000/- रुपये परत देण्यात येतील,तसेच कंपनीकडून तीन डेमो घेण्यात येणार असल्याचे संबंधितांनी सांगितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.मात्र,ठरलेल्या तारखेनंतरही संबंधित इंजिनिअर फिटिंगसाठी आले नाहीत.
त्यानंतर कंपनीकडून देण्यात आलेल्या मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते क्रमांक बंद असल्याचे आढळून आले.त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचा संशय व्यक्त करीत सौ. कविता बोलीवार यांनी सावली पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधित कंपनी व व्यक्तींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी तक्रारदारांनी केली आहे.तक्रारीच्या वेळी सौ.सुनीता कुमदेव उरकुडे (व्याहाड खुर्द),सौ.प्रणिता अनिल मशाखेत्री (मोखाळा),सौ.रेखा लालाजी बानबले (चिखली) व सौ.ज्योती श्रीकांत बहिरवार (चारगाव) पोलिस तपासानंतरच या प्रकरणातील आरोपांची सत्यता स्पष्ट होणार आहे.
error: Content is protected !!