Monday, September 14, 2026
Home Breaking News अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक ;...

अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक ; एकूण 21 लाख 82 हजार रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत 📍स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कोटगुल येथील पोलीस पथकाची संयुक्त कारवाई

अंमली पदार्थाचे उत्पादन घेऊन विक्री करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक ; एकूण 21 लाख 82 हजार रुपयांचा अंमली पदार्थ हस्तगत

📍स्थानिक गुन्हे शाखा व पोस्टे कोटगुल येथील पोलीस पथकाची संयुक्त कारवाई

सुकदर्शन वृतांत 
गडचिरोली : (दिनांक,07/09/2026) गडचिरोली जिल्ह्रात अवैध कारवायांना आळा घालून सूरक्षित वातावरण निर्माण होण्यासाठी विशेष निर्देश पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. एम. रमेश यांनी दिले आहेत. याकरीता अंमली पदार्थ तस्करी व इतर अवैध कारवाया करणा­यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देखील सर्व पोस्टे/उपपोस्टे/पोमकें प्रभारी अधिकारी यांना देण्यात आले आहेत.
या पाश्र्वभूमीवर गडचिरोली पोलीसांकडून काल दिनांक 06/09/2026 रोजी उपविभाग कुरखेडा अंतर्गत येणा­या पोलीस स्टेशन, कोटगुल हद्दीतील मौजा नांगपूर येथे अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्यात आली आहे. 
सविस्तर वृत्त असे आहे की, काल दिनांक 06/09/2026 रोजी पोलीस स्टेशन कोटगुल येथिल पोलीस पथक यांना गोपनिय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, मौजा नांगपूर येथील इसम अधारी धनसिंग कुवरढेरीया,वय,58 वर्ष रा.नागपूर ता.कोरची जि.गडचिरोली याने त्यांच्या घराच्या पाठीमागील सांदवाडीत अवैधरित्या अंमली पदार्थ (गांजा) ची लागवड केली आहे.
अशा माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री.एम.रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक व पोलीस स्टेशन कोटगुल येथिल पोलीस पथक मौजा नांगपूर येथे रवाना झाले. गोपनिय माहितीच्या अनुषंगाने संशयीत नामे अधारी धनसिंग कुवरढेरीया, वय 58 वर्ष, रा.नांगपूर ता.कोरची जि.गडचिरोली यांचे घरी पोहचून सर्व कायदेशीर प्रक्रियेस अनुसरुन पोलीस पथकाने त्याच्या घराच्या पाठीमागील सांदवाडीत पंचासमक्ष झडती घेतली.
त्याच्या सांदवाडीत अमली पदार्थ (गांजा) ची झाडे लागवड केलेले मिळून आले.सदर ठिकाणी पंचासमक्ष तपासणी केली असता, शेतात लागवड केलेला एकूण 43.653 कि.ग्रॅ वजन असलेला कॅनबिस वनस्पती अंमली पदार्थ (गांजा) प्रति किलो 50,000/- रुपये प्रमाणे एकुण 21,82,650 रु. (एकवीस लाख ब्याएेंशी हजार सहाशे पन्नास रुपये) किंमतीचा मुद्येमाल मिळुन आला.
आरोपी याने स्वत:च्या घराच्या पाठीमागील सांदवाडी मध्ये विक्री करण्याच्या उद्देशाने सदर अंमली पदार्थ उगवला असल्याने आरोपी नामे अधारी धनसिंग कुवरढेरीया वय,58 वर्ष, रा.नांगपूर ता.कोरची जि.गडचिरोली याचे विरुध्द पोलीस स्टेशन,कोटगुल 
दिनांक 06/09/2026 रोजी अप. क्र. 13/2026, कलम 8 (क),20(अ)(ब)(त्त्) 20(क) गुंगिकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस) 1985 अन्वये गुन्हा दाखल करुन मिळून आलेला अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे.
आरोपीस 01 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली असून, सदर गुन्ह्राचा पुढील तपास पोस्टे कोटगुल येथील पोउपनि. विवेक वायकर हे करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गडचिरोली श्री. एम. रमेश, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. कार्तिक मधिरा,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)
श्री.गोकुल राज जी.उपविभागीय पोलीस अधिकारी,कुरखेडा श्री.प्रमोद मडामे यांचे मार्गदर्शनाखालीे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.अरूण फेगडे तसेच पोस्टे कोटगुल चे प्रभारी अधिकारी पोउपनि विवेक वायकर,यांचे नेतृत्वात पो.ना/स्वप्नील कुडावले, पो.अं/प्रशांत गरफडे, रोहित गोंगले, शिवप्रसाद करमे
चा.पो.अं/रामदास उईनवार पोहवा/श्यामलाल नैताम, मनोज नैताम, अनिल हिडामी, प्रभु तिलारे यांनी पार पाडली.
error: Content is protected !!