Friday, August 14, 2026
Home Gadchiroli जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे अवयवदान शपथविधी कार्यक्रम उत्साहात संपन्न.

जिल्हा सामान्य रुग्णालय, गडचिरोली येथे अवयवदान शपथविधी कार्यक्रम उत्साहात संपन्न.

0
18

जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे अवयवदान शपथविधी कार्यक्रम उत्साहात संपन्न.

सुकदर्शन वृतांत
गडचिरोली दि.४ ऑगस्ट २०२६ : अवयवदान पंधरवडा जनजागृती अभियानाच्या निमित्ताने आज दि.४ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली येथे अवयवदान शपथविधी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहाडे उपस्थित होत्या.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.वर्षा लहाडे यांनी वैद्यकीय शिक्षण घेत असतानाचा एक हृदयस्पर्शी अनुभव उपस्थितांसमोर मांडला. दृष्टीहीन बालकावर नेत्र प्रत्यारोपण करण्यात आल्या.नंतर त्याला प्रथमच नवीन दृष्टी लाभली आणि त्याच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा त्यांच्या आयुष्यातील अत्यंत अविस्मरणीय क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.
अशा प्रकारचे आनंदाचे क्षण गरजू रुग्णांच्या आयुष्यात निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने अवयवदानाचा संकल्प करावा,असे भावनिक आवाहन त्यांनी केले.यावेळी डॉ. वर्षा लहाडे यांनी स्वतः अवयवदानाचे प्रतिज्ञापत्र भरून अवयवदानाचा संकल्प केला तसेच उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांनाही अवयवदानाची शपथ दिली.
सरतेशेवटी भिषक तज्ञ डॉ. मनीष मेश्राम यांनी नर्सिंग स्टाफला अवयवदान व अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल कंकणालवार यांनी केले.
कार्यक्रमास जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी,परिचारिका, कर्मचारी व इतर अधिकारी – कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी अवयवदानाचा संकल्प करून समाजात अवयवदानाबाबत जनजागृती करण्याची प्रतिज्ञा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!